Headlines

आजच्या काळात विद्यार्थ्यांसाठी खेळ आणि व्यायाम अत्यंत आवश्यक- गोरे:पाथर्डीमध्ये व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद‎




सध्याच्या धावपळीच्या आणि वाढत्या तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांच्या शरीरासोबतच मनाची मजबुतीही महत्त्वाची असून त्यासाठी खेळ आणि व्यायाम आवश्यक आहेत, असे प्रतिपादन बेस्ट फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा भाऊसाहेब गोरे यांनी केले. पाथर्डी येथील चॅम्पियन्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्त्व विकास व आनंददायी शिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी तालुका तायक्वांदो अकादमीचे सचिव अंबादास साठे होते. यावेळी अकादमीच्या प्रशिक्षक पायल असलकर, सामाजिक कार्यकर्त्या भारती असलकर, नंदिनी काटकर उपस्थित होते. गोरे म्हणाले, विद्यार्थ्यांच्या जीवनात स्वसंरक्षण, शिस्त, आत्मविश्वास, धैर्य आणि स्वतःवरील विश्वास निर्माण करण्यासाठी तायक्वांदोसारखे खेळ आवश्यक आहेत. भीती आणि रागावर नियंत्रण ठेवणे तसेच स्वतःच्या कमकुवतपणावर मात करण्यासाठी खेळाची सवय उपयुक्त ठरते. समाजाने अशा उपक्रमांना पाठबळ दिले पाहिजे. विद्यार्थ्यांनी केवळ जिंकण्याचे ध्येय न ठेवता स्वतःची सर्वोत्तम आवृत्ती बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. खेळाच्या मैदानावर आलेली शिस्त अभ्यासाच्या टेबलवर आली तर विद्यार्थ्यांचे भविष्य उजळेल. कार्यशाळेदरम्यान विद्यार्थ्यांशी संवाद साधत गोरे यांनी हसत-खेळत आनंददायी शिक्षण दिले. गाणी, गोष्टी आणि विविध मजेशीर खेळांच्या माध्यमातून भाषा, गणित, विज्ञान, देशभक्ती व कला या विषयांचे उदाहरण देत कृतीतून शिक्षण देण्यात आले. समाजासाठी जीवन समर्पित करणारे संत-महात्मे व थोर व्यक्तींच्या जीवनातील संघर्ष आणि त्यांनी संकटांवर केलेली मात यांची उदाहरणेही विद्यार्थ्यांना सांगण्यात आली. प्रास्ताविक पायल असलकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारती असलकर यांनी केले तर नंदिनी काटकर यांनी आभार मानले. यावेळी अकॅडमीतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यशाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अनेक नव्या गोष्टींचे ज्ञान मिळाले तसेच त्यांच्यात आत्मविश्वास वाढण्यास मदत मिळाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे पालकांनीही मनापासून कौतुक केले. यावेळी विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांना हसतखेळत अन् आनंददायी शिक्षण कार्यशाळेदरम्यान विद्यार्थ्यांशी संवाद साधत गोरे यांनी हसत-खेळत आनंददायी शिक्षण दिले. गाणी, गोष्टी आणि विविध मजेशीर खेळांच्या माध्यमातून भाषा, गणित, विज्ञान, देशभक्ती व कला या विषयांचे उदाहरण देत कृतीतून शिक्षण देण्यात आले. समाजासाठी जीवन समर्पित करणारे संत-महात्मे व थोर व्यक्तींच्या जीवनातील संघर्ष आणि त्यांनी संकटांवर केलेली मात यांची उदाहरणेही विद्यार्थ्यांना सांगण्यात आली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *