Headlines

नामपूरला दोधेश्वर मंदिर परिसरात सात हजार वृक्षलागवडीचा संकल्प:हिरे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा पुढाकार; 700 झाडांचे रोपण‎




महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित समाजश्री प्रशांत हिरे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाने दोधेश्वर महादेव मंदिर परिसरातील वन विभागाच्या क्षेत्रात ७०० वृक्षांची लागवड केली. आगामी काळात ७ हजार वृक्षलागवडीचा संकल्प करण्यात आला असून, या परिसरात मोठ्या प्रमाणावर समपातळी चर, समचर व दगडी बंधारे बांधून जलसंधारणाचे काम करण्याचा मानस राष्ट्रीय सेवा योजना विभागाने व्यक्त केला आहे. वाढती लोकसंख्या आणि मानवी विकासामुळे दिवसेंदिवस पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. त्याचबरोबर भूजलपातळीही झपाट्याने घटत आहे. त्यामुळे वृक्षारोपण आणि जलसंवर्धनाची चळवळ भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. उज्जन कदम यांनी प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी केले. मंदिर परिसरातील महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाच्या क्षेत्रात ‘वृक्षारोपण व जलसंवर्धन’ प्रकल्पाचे उद्घाटन मंदिर देवस्थानचे महंत स्वामी हरिओमानंद पुरीजी महाराज, प्राचार्य डॉ. उज्जन कदम, उपप्राचार्य डॉ. अनिल सावळे आणि राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. हर्षल बच्छाव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महंत स्वामी हरिओमानंद पुरीजी महाराज यांनी या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले. वाढते तापमान, प्रदूषण आणि वृक्षांचा ऱ्हास या समस्या समाजासमोर उभ्या असताना पर्यावरण संवर्धनासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. दोधेश्वर परिसरात वृक्षारोपण व जलसंवर्धनासाठी भरीव काम करण्याचा संकल्पही त्यांनी व्यक्त केला. प्रतिनिधी | चांदवड तळेगावरोही येथील बुद्ध विहार स्मारक समिती गट नं. १०२० च्या राखीव जागेत वर्षावासाच्या पवित्र पर्वानिमित्त वृक्षारोपण व भोजनदानाचा कार्यक्रम नुकताच पार पडला. या कार्यक्रमात बुद्ध विहार परिसरात पिंपळ, वड, चिंच, आंबा आदी ५० हून अधिक विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. या कार्यक्रमासाठी बुद्ध धम्माचे पूज्य भन्ते दिपणकर थेरो, भन्ते उपालीबोधी, भन्ते सारीपुत्त यांच्यासह प्रमुख अतिथी म्हणून समता सैनिक दलाचे आत्माराम वानखेडे, भास्कर संसारे, सुखराम वानखेडे, दीपक अहिरे, भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष अमोल पगारे उपस्थित होते. या सर्व मान्यवरांच्या हस्ते व भिक्खू संघाच्या उपस्थितीत बुद्ध विहार परिसरात पिंपळ, वड, चिंच, आंबा आदी ५० हून अधिक विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी भन्ते चंद्र बोधी यांनी बुद्धांच्या करुणा, मैत्री व अहिंसेचा संदेश देत ‘वृक्ष हे पृथ्वीचे अलंकार असून, त्यांचे संवर्धन करणे हीच खरी धम्मसेवा आहे’, असे प्रतिपादन केले. कार्यक्रमास बुद्ध विहार समितीचे संचालक सुखदेव केदारे, अंबादास केदारे, अ‍ॅड. राहुल गायकवाड, रवींद्र केदारे, शशिकांत केदारे, गावचे पोलिस पाटील अविनाश अहिरे यांच्यासह बौद्ध उपासक, महिला मंडळ व गावातील सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. वृक्षारोपणानंतर सर्व उपस्थितांसाठी भोजनदानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी बुद्ध विहार स्मारक समिती, तळेगावरोहीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमातून पर्यावरण संवर्धनासोबतच सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *