Headlines

वैद्यकीय प्रवेशाच्या गुणवत्ता यादीत आरक्षणावर सीईटी सेलचा डल्ला:हक्काची सवलत डावलून शेकडो विद्यार्थ्यांना टाकले थेट ‘ओपन’मध्ये!




एकीकडे मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभरात रान पेटवले, तर दुसरीकडे ज्यांना आधीपासूनचे घटनादत्त आरक्षण आहे, अशा विद्यार्थ्यांचे आरक्षण सीईटी सेलने परस्पर संपुष्टात आणले. सीईटी सेलने एमबीबीएस, बीडीएस या (ग्रूप-ए) वैद्यकीय प्रवेशाची अंतिम गुणवत्ता यादी 28 ऑगस्टला प्रसिद्ध केली. धक्कादायक म्हणजे जालन्याच्या (ता. बदनापूर) आदित्य हरी कोल्हे या विद्यार्थ्याला तात्पुरत्या गुणवत्ता यादीत ‘एनटी-सी’साठी पात्र ठरवले. नंतर लगेच ‘ओबीसी’ नव्हे थेट ‘ओपन’ गटात टाकले. यश खारुळे हा ‘एससी’ विद्यार्थी. त्यालाही ‘ओपन’ केले. संभाजीनगरच्या शिवाजीनगरातील नित्या ठेंगरे या विद्यार्थिनीला तर ओएमएससी अर्थात आऊटसाइड महाराष्ट्र स्टेट कँडिडेट घोषित केले. त्यामुळे 30 ऑगस्टला जाहीर झालेल्या यादीत तिघांही विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहावे लागले. छत्रपती संभाजीनगरात असे शेकडो विद्यार्थी आहेत. केस 1
सीईटी सेल भवितव्याशी खेळतंय : आदित्य कोल्हे आदित्य कोल्हेच्या ‘एनटी-सी’ कॅटेगरीतील रँक 1,39,088 आहे. या रँकवर बीडीएसमध्ये चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश नक्की होणार होता. मात्र त्याला थेट ‘ओपन’ केल्यामुळे त्याचा ऑल इंडिया रँक 2,97,103 झाला. त्यामुळे त्याचा पहिल्या यादीत प्रवेश होऊ शकला नाही. आदित्य पूर्णपणे हताश झाला. तो म्हणाला, ‘ सीईटी सेलने माझ्या भवितव्याशी खेळ केला. शासनाने 6 महिन्यांत जात वैधता प्रमाणपत्र देण्याची सवलत दिली आहे. मी 2 जुलैला जात वैधतेसाठी अर्ज केला. काही दिवसांत मला प्रमाणपत्र मिळेलच. पण मी आता स्पर्धेबाहेर गेलो.’ केस 2
मी राज्याबाहेरची कशी, नित्या ठेंगरे हिचा सवाल गारखेड्याच्या शिवाजीनगरातील नित्या ठेंगरे ही मराठा समाजाची विद्यार्थिनी आहे. तिला ‘एसईबीसी’तून एमबीबीएस सीट हवी होती. तिचा ऑल इंडिया रँक 68,477 आहे. पण रविवारच्या यादीत तिचे नावच नाही. नित्या म्हणते, ‘मी शहरात राहते तरीही सीईटी सेलने महाराष्ट्राबाहेरची घोषित केले..? येथील कक्षात दाद न मिळाल्याने सोमवारी मुंबईच्या सीईटी सेलमध्ये जाणार आहे.’ केस 3 ओपन ठरवून अन्याय का केला : यश खारुळे यश खारुळे हा शहरातील नारेगाव (संभाजीनगर) येथील विद्यार्थी. त्याला एससी प्रवर्गातून प्रवेश हवा होता. त्याचा ऑल इंडिया रँक 7,14,334 आहे. तर स्टेटमध्ये एससीमधून 3797 आहे. त्याचा प्रवेश बीएएमएसमध्ये होऊ शकतो. सीईटी सेलने ‘एससी’मधून ‘ओपन’ मध्ये टाकले. जात वैधता प्रमाणपत्रासाठी दिलेल्या अर्जाची पावती जोडली तरीही मला ओपन केले आहे.’ केस टू केस चेक करून सांगावे लागेल रविवारी सुटी असल्यामुळे सोमवारी मला यादी बघून केस टू केस पाहावे लागेल. नेमके त्यांना का ओपन केले., याची कारणे शोधावी लागतील. विद्यार्थ्यांनी तक्रार केली तर आम्ही चेक करू. -विनोद मळाले, जनसंपर्क अधिकारी, सीईटी सेल शासनाकडूनच स्वत:चे निर्णय पायदळी 2 जुलै 2026 च्या शासननिर्णयानुसार ‘व्हॅलिडिटी’ला 6 महिने मुदत आहे. तोपर्यंत अर्जाची पावती जोडणे क्रमप्राप्त असते. तरीही ‘ओपन’ कॅटेगरीत टाकले. सीईटी सेलने विद्यार्थ्यांच्या भ‌वितव्याशी खेळ केला आहे. -सावनकुमार चुडिवाल, अभ्यासक



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *