Headlines

निष्ठावान शिवसैनिक हाच उबाठाचा श्वास:चांदवड येथील आढावा बैठकीत माजी आमदार रवींद्र मिर्लेकर यांनी साधला संवाद‎




आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उबाठा) पक्षाने चांदवड तालुक्यात संघटनात्मक बांधणीला वेग देत बूथ पातळीवरील यंत्रणा मजबूत करण्याचा निर्णय घेतला. तळागाळातील मतदारांशी थेट संवाद वाढविण्यासाठी ‘बूथ लेव्हल एजंट’ (बीएलए) यंत्रणा सक्षम करण्यावर आढावा बैठकीत चर्चा झाली. माजी आमदार रवींद्र मिर्लेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली. मिर्लेकर म्हणाले की, निष्ठावान शिवसैनिक हाच पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांचा खरा श्वास आणि ताकद आहे. गावोगावी जाऊन जनसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासोबत पक्षाची ध्येयधोरणे घरोघरी पोहोचविणे ही प्रत्येक कार्यकर्त्याची जबाबदारी आहे. बूथ पातळीवरील कार्यकर्ता सक्षम असेल, तर पक्षाचा पाया अधिक भक्कम होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बीएलएची नियुक्ती करताना सक्रिय कार्यकर्त्यांची निवड, मतदार याद्यांमधील बारकावे तपासणे आणि प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याच्या नियोजनावर त्यांनी भर दिला. . बैठकीस जयंत दिंडे, सुनील पाटील, जिल्हाप्रमुख नितीन आहेर, कारभारी आहेर, भारती जाधव, अर्चना पुरकर, रवि काळे आदी उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *