![]()
शहरातील नाले, सार्वजनिक ठिकाणे आणि परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी महानगरपालिकेने आता कडक भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. शहरातील राजकमल चौक ते राजापेठ या मार्गादरम्यान मध्यभागी असलेल्या अंबा नाल्याची महापौर श्रीचंद तेजवानी यांनी रविवार, ३० ऑगस्ट रोजी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली. पाहणीदरम्यान नाल्यात कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. संबंधितांकडून दोन दंड आकारण्यात आले. शहर स्वच्छ ठेवणे ही केवळ महानगरपालिकेची जबाबदारी नाही. ती प्रत्येक नागरिकाचीही जबाबदारी आहे. नागरिकांनी स्वतः कचरा नाल्यात टाकू नये. इतर कोणालाही नाल्यात कचरा टाकू देऊ नये,” असे आवाहन महापौरांनी केले. नाल्यात अथवा सार्वजनिक ठिकाणी कोणी कचरा टाकताना आढळल्यास नागरिकांनी त्याकडे दुर्लक्ष करू नये. तातडीने संबंधित प्रभागातील स्वास्थ निरीक्षकांना माहिती द्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, नगरसेविका लविना हर्षे यांच्या घराच्या बाजूला असलेल्या नाल्यात मोठ्या प्रमाणात हॉस्पिटलमधील जैववैद्यकीय कचरा तसेच खराब साहित्य टाकण्यात येत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या प्रकाराची माहिती मिळताच महापौर श्रीचंद तेजवानी यांनी घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. या पाहणीदरम्यान नगरसेवक ॲड. प्रशांत देशपांडे, झोन क्र. २ चे सहाय्यक आयुक्त भूषण पुसतकर, स्वास्थ निरीक्षक प्रशांत गावनेर उपस्थित होते. हॉस्पिटलची माहिती घेऊन कठोर कारवाई करा नाल्यात वैद्यकीय कचरा टाकणाऱ्या संबंधित हॉस्पिटलची माहिती घ्यावी. या प्रकरणाची चौकशी करावी. नियमांनुसार कठोर कारवाई करावी, असे आदेशही त्यांनी दिले. अशा प्रकारांकडे दुर्लक्ष न करता संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची भूमिका महापौरांनी घेतली आहे.
Source link
अंबा नाल्यात कचरा टाकणाऱ्यांवर महापौरांचा दणका:दंडांची कारवाई, हॉस्पिटलचा जैव वैद्यकीय कचरा नाल्यात टाकणाऱ्यांवर कारवाईचे निर्देश