Headlines

मंदिर संरक्षण, देवस्थान इनाम जमीन, पारदर्शक प्रशासनावर चर्चा:मोर्शी येथे महाराष्ट्र देवस्थान समितीची तालुका मंदिर विश्वस्त बैठक उत्साहात, 60 हून अधिक मंदिर विश्वस्ताची उपस्थिती‎



मंदिर संस्कृतीचे रक्षण व संवर्धन, देवस्थान इनाम जमिनींचे संरक्षण, मंदिरांचे पारदर्शक व प्रभावी व्यवस्थापन तसेच मंदिर विश्वस्तांना संघटित व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र देवस्थान समिती, अमरावती जिल्हा यांच्या वतीने आयोजित मोर्शी त

.

या बैठकीस मोर्शी तालुक्यातील ६० हून अधिक मंदिर विश्वस्त, अध्यक्ष, पदाधिकारी, पुजारी, सेवेकरी व धर्मप्रेमी नागरिकांची उपस्थिती होती. मंदिरांच्या विविध समस्या, देवस्थान इनाम जमिनी, महसूल नोंदी, मंदिर प्रशासन, कायदेशीर बाबी तसेच मंदिरांच्या विकासासाठी संघटितपणे काम करण्याच्या विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीच्या व्यासपीठावर महाराष्ट्र देवस्थान समितीचे निलेश टवलारे, श्री नागेश्वर महादेव संस्थान, धामंत्रीचे उपाध्यक्ष विजय करडे, वर्धा जिल्हा समन्वयक व रघुनाथ महाराज संस्थानचे अध्यक्ष धनराज वेलनकर, रुक्मिणी विदर्भ पीठचे विश्वस्त-सचिव प्रकाश घोरमाडे, बालयोगी राजेश्वर माऊली ट्रस्टचे उपाध्यक्ष श्रीकृष्ण माहोरे, तसेच महादेव मंदिर, चांदूर रेल्वेचे अध्यक्ष व देवस्थान समितीचे कैलास गिरोळकर उपस्थित होते.

मान्यवरांनी उपस्थित मंदिर विश्वस्तांना महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कार्याची उद्दिष्टे, मंदिर संरक्षणासाठी संघटित प्रयत्नांची आवश्यकता, देवस्थान जमिनींचे संरक्षण, महसूल व प्रशासकीय बाबींमध्ये घ्यावयाची दक्षता आणि मंदिरांच्या सर्वांगीण विकासासाठी भविष्यातील दिशा याबाबत मार्गदर्शन केले. बैठकीमध्ये मंदिर संस्कृतीचे रक्षण व संवर्धन, देवस्थान इनाम जमिनी व महसूल नोंदींचे संरक्षण, मंदिरांचे पारदर्शक व्यवस्थापन, धर्मदाय आयुक्त कार्यालयाशी समन्वय, मंदिरांच्या कायदेशीर अडचणी, धार्मिक उपक्रमांना चालना आणि मंदिर विश्वस्तांचे संघटन अधिक मजबूत करण्याबाबत उपस्थितांनी आपले विचार मांडले.

या बैठकीस हनुमान मंदिर, डोंगर यावलीचे नंदकिशोर बारोडकर, चंद्रशेखर गांजरे, नानोजी महाराज संस्थान, नेर पिंगळाईचे श्याम पांडे, समर्थ साई बाबा संस्थान, रवी नगर मोर्शीचे अध्यक्ष अक्षय ढोले, महारुद्र उर्फ मारुती बाबा संस्थान, नेर पिंगळाईचे रमेश संभे, महाकाली मंदिर देवस्थान, चिंचोली गवळीचे विश्वस्त शालिग्राम वानखडे, समर्थ नाना गुरु संस्थान, निंभीचे अशोक ठाकरे, संत शंभू गिरी महाराज संस्थान, निंभीचे दिलीप ठाकरे, प्रदीप देशमुख, महादेव देवस्थान सालबर्डीचे प्रतिनिधी सुभाष मानकर, सुरेश कोकाटे, साहेबराव फंदे, शिवदास कानबाले, पुंजाजी अंभोरे यांच्यासह मोर्शी तालुक्यातील विविध मंदिरांचे विश्वस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीचे सूत्रसंचालन मुकेश पवार यांनी केले, तर रुक्मिणी विदर्भ पीठचे गिरीधर चव्हाण यांनी आभार प्रदर्शन केले.

मंदिर संरक्षणासाठी संघटित होण्याचा निर्धार मोर्शी तालुक्यातील मंदिर विश्वस्तांना एकत्र आणून त्यांच्या समस्या जाणून घेणे आणि त्या प्रश्नांवर तालुका व जिल्हास्तरावर संघटितपणे काम करण्याच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वपूर्ण ठरली. मंदिरांचे संरक्षण, संवर्धन आणि विकासासाठी भविष्यातही अशा प्रकारच्या बैठका व उपक्रम सातत्याने घेण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. मंदिरांचे संरक्षण, संवर्धन आणि सशक्त संघटनासाठी एकत्र येऊया! अशा निर्धाराने मोर्शी तालुका मंदिर विश्वस्त बैठक उत्साहपूर्ण वातावरणात झाली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *