![]()
मराठा आरक्षणाच्या प्रमुख मागण्यांसाठी आणि संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाला राज्यभरातून उत्स्फूर्त आणि तीव्र पाठिंबा मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर, कन्नड तालुक्यातील औराळा फाटा येथे सकल मराठा समाजाच्या वतीने ती
.
पैठण | मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे सुरू केलेल्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी पैठणमध्ये रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा अखंड मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे. जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा चौथा दिवस असून त्यांच्या प्रकृतीबाबत समाजबांधवांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. शासनाने मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर तातडीने सकारात्मक व ठोस निर्णय घ्यावा, या मागणीसाठी पैठण–शेवगाव रोडवरील सह्याद्री चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.
छत्रपती संभाजीनगर | गेल्या २९ ऑगस्टपासून मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी जिल्ह्यातून प्रतिसाद मिळत आहे. मंगळवारी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात फुलंब्री, औराळा, लाडगाव, पैठण येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केल्या. काही काळ वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. आंदोलकांनी प्रशासन आणि पोलिसांना निवेदन दिले.
वैजापूर | मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मंगळवारी वैजापूर तालुक्यातील लाडगाव येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. मराठा सेवक प्रशांत सदाफळ यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात गावासह पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.आंदोलनादरम्यान ‘एक मराठा, लाख मराठा’सह विविध घोषणा देत आंदोलकांनी जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शवला. या आंदोलनात विविध समाजांतील नागरिकांनीही सहभाग नोंदवत मराठा आरक्षणाच्या मागणीला समर्थन दिले. रस्त्यावर ठिय्या देऊन शासनाचे लक्ष वेधले.
फुलंब्री | मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी मंगळवारी सकाळी ११ वाजता फुलंब्री शहरातील संभाजीनगर-सिल्लोड राष्ट्रीय महामार्गावरील टी पॉइंटवर मराठा समाजबांधवांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. समाजबांधवांनी सरकारविरोधात तीव्र घोषणाबाजी करत परिसर दुमदुमून टाकला होता . मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाची आणि मागण्यांची शासनाने तात्काळ दखल घ्यावी, नसता तालुक्यात यापेक्षाही अधिक तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा उपस्थित आंदोलकांनी दिला.