Headlines

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हा परिषदेवर धरणे:मानधनावरील कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घेण्याची मागणी‎




ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासन आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनने मंगळवारी १ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषद मुख्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालय असा ‘हक्क मूक मोर्चा’ काढला. त्यानंतर मोर्चेकऱ्यांनी जिल्हा परिषदेसमोर धरणे दिले. म.रा. ग्रामपंचायत अधिकारी युनियनचे मानद अध्यक्ष कमलाकर वनवे, जिल्हाध्यक्ष आशिष भागवत, सरचिटणीस प्रशांत टिंगणे यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. गेल्या १७ ऑगस्ट रोजी वडगाव (जि. जळगाव) येथील ग्रामपंचायत कर्मचारी व्ही. पी. पाटील यांच्यावर ग्रामपंचायत कार्यालयात काम करत असताना प्राणघातक हल्ला झाला. त्यानंतर आलेल्या हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे राज्यभरातील कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड संताप पसरला आहे. काही जिल्ह्यांतील ग्रामपंचायत अधिकारी संपावर गेले आहेत. या घटनेचा तीव्र निषेध नोंदवण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांना संरक्षण देण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान दिवंगत व्ही. पी. पाटील यांच्या हल्लेखोरांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी. सर्व संशयितांवर तातडीने गुन्हे दाखल करावेत. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना कायदेशीर संरक्षण पुरवावे. ग्रामपंचायत कार्यालयामध्ये कर्मचाऱ्यांचे अनधिकृतपणे व्हिडिओ काढणे किंवा सोशल मीडियावर अपलोड करून बदनामी करणे यावर पूर्णतः बंदी घालावी. संवेदनशील ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांना मोफत पोलीस संरक्षण पुरवावे. कृषी, आरोग्य, समाजकल्याण इत्यादी इतर विभागांच्या योजनांचा अतिरिक्त भार लादणे बंद करावे. सर्व सवलती, पदोन्नती, वेतन सुधारणा वेळेवर लागू कराव्यात. मानधनावरील कर्मचाऱ्यांना तत्काळ कायम सेवेत समाविष्ट करावे. अशा मागण्यादेखील पुढे करण्यात आल्या.राज्यभरातील कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड संताप पसरला आहे. काही जिल्ह्यांतील ग्रामपंचायत अधिकारी संपावर गेले आहेत. या घटनेचा तीव्र निषेध नोंदवण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांना संरक्षण देण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. बहिष्कार कायमच सदर आंदोलनाच्या अनुषंगाने ग्रामपंचायत अधिकारी युनियनने संप, बहिष्कार आदी आंदोलनांचीही घोषणा केली होती. त्यापैकी ग्रामपंचायतींच्या ग्रामसभांवरील बहिष्काराचे आंदोलन अमरावतीत सुरूच आहे. कोणत्याही ग्रामसभेचे इतिवृत्त नोंद करणे हे सचिव या नात्याने ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचे काम असते. मात्र मागण्या मान्य होईस्तोवर अशा कोणत्याही ग्रामसभेला सचिव या नात्याने अनुपस्थित राहण्याची भूमिका युनियनने घेतली आहे. मानद अध्यक्ष कमलाकर वनवे यांनी ही माहिती दिली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *