Headlines

अविट गोडीच्या भाव, भक्तिगीतांचा रसिक श्रोत्यांवर स्वराभिषेक:बार्शीतील उत्तरेश्वरचरणी श्रावण भक्तिधारा, संगिताची अविट गोडी आणि सुमधुर मैफलीत रसिकश्रोते चिंब‎



बासरीची धून अन् गणेश वंदनेने सुरू झालेल्या संगीत आराधणेत अविट गोडीच्या भाव, भक्तिगीतांच्या सुमधुर मैफलीत रसिकश्रोते चिंब झाले. शंभो महादेवाची आराधना करत मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश अशा विश्वासाने भक्तिगीताला रंग चढला. टाळ-मृदंगाच्या तालावर श्रीविठ्

.

श्रावण महिन्यानिमित्त श्री स्वामी समर्थ संगीत विद्यालयाच्या वतीने रविवारी श्री उत्तरेश्वर मंदिर येथे श्रावण भक्तिधारा हा सुमधुर अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम झाला. मागील २५ वर्षांपासून समर्थ संगीत विद्यालयाच्या वतीने श्री उत्तरेश्वरचरणी ही संगीत सेवा अर्पण केली जात आहे. यंदाचे हे २६ वे वर्ष आहे. या कार्यक्रमाची सुरुवात मनस्वी पालके हिने गायलेल्या गणेश स्तवनाने करण्यात आली. या कार्यक्रमांत संवादिनीवर सरिता कुलकर्णी, दिपाली सहस्रबुद्धे यांनी तसेच तबल्यावर तुषार गदगी, कैवल्य सहस्रबुध्दे, प्रतीक शर्मा यांनी उत्तम साथ केली.

या गीतांच्या सादरीकरणामुळे भक्तिरसात न्हाऊन निघाले भाविक आरंभी वंदिन, शंभो श्री महादेव (धृपद), मागे उभा मंगेश, शीव कैलास के वासी, अच्युतम केशवम्, अमृताहुनी गोड, देह शुद्ध करोनि, शीव साजिरा गोजिरा, पंढरीच्या माझ्या विठ्ठला, आवडे पंढरी, शोधिसी मानवा, हर हर महादेव, देह देवाचे मंदिर, हरी भजनाविण काळ, इंद्रायणी काठी, शिवशंकर को जिसने पूजा, नाम तुझे बरवे गा, महादेव शंकर है, माझा भाव तुझे चरणी, ध्यान लागले रामाचे, मज भेटूनि जा हो, माझे माहेर पंढरी, सत्यम शिवम सुंदरम, विठु माऊली तु, झालिया गुरुकृपा पूर्ण, देवा माझे मन आदि गीतांचे सादरिकरण झाले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *