Headlines

दु:ख घेऊन आले… उपचाराची आशा घेऊन परतले!:प्लास्टिक सर्जरी शिबिरात 80 रुग्णांची तपासणी; बोथरा परिवाराचा सेवाभावी पुढाकार‎




चेहऱ्यावरील व्रण, जन्मजात व्यंग, जुनाट जखमा तसेच विविध शारीरिक समस्यांमुळे त्रस्त रुग्णांसाठी आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये आयोजित प्लास्टिक सर्जरी शिबिर आशेचा किरण ठरले. राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त स्वर्गीय वैशाली सुबोध बोथरा यांच्या स्मरणार्थ बोथरा ग्रुप व बोथरा परिवाराच्या वतीने आयोजित या शिबिरात ८० रुग्णांची तपासणी करण्यात आली. शिबिराचे उद्घाटन उद्योजक सुवालाल बोथरा, विनोद बोथरा, प्रमोद बोथरा, प्रकाश बोथरा व सुबोध बोथरा यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाले. यावेळी सुवालाल बोथरा यांनी आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या निस्वार्थ रुग्णसेवेचे कौतुक केले. पूर्वी अहिल्यानगरमधील रुग्णांना प्रगत उपचारांसाठी मुंबई-पुण्याला जावे लागत होते. मात्र, अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे आता जिल्ह्यातच दर्जेदार उपचार उपलब्ध होत असल्याचे त्यांनी सांगितले. मोहक बोथरा यांनी प्लास्टिक सर्जरीसारखे महागडे उपचार सर्वसामान्यांना परवडत नसल्याने अनेक रुग्ण उपचारांपासून वंचित राहतात. या शिबिरामुळे अशा रुग्णांना योग्य मार्गदर्शन व उपचाराची दिशा मिळत असल्याचे सांगितले. डॉ. मृदुला मूळे यांनी सांगितले की, आनंदऋषीजी हॉस्पिटल हे अहिल्यानगर जिल्ह्यातील स्माईल ट्रेन प्रोजेक्टचे पहिले सेंटर आहे. दुभंगलेले ओठ, फाटलेले ओठ व टाळूच्या शस्त्रक्रिया या प्रकल्पांतर्गत मोफत केल्या जातात. तसेच जन्मजात हातांच्या समस्या, व्यंग, मधुमेहामुळे झालेल्या जुनाट जखमा, हातांच्या नसांचे आजार, चेहऱ्यावरील व्रण, कर्करोगाच्या गाठी आदींची तपासणी व उपचारासाठी मार्गदर्शन करण्यात आले. संतोष बोथरा यांनी सांगितले की, ऑगस्ट महिन्यातील १६ महाआरोग्य शिबिरांतून तब्बल ५ हजार ८०० रुग्णांनी लाभ घेतला. सूत्रसंचालन डॉ. आशिष भंडारी यांनी केले, तर आभार सतीश लोढा यांनी मानले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *