Headlines

Laxman Hake Criticizes Maratha Reservation Impact on OBC Rights in Maharashtra


आमचे 27 टक्के आरक्षण हे सामाजिक मागासांचे असून ते प्रतिनिधित्वासाठी आहे. परंतु, कारखानदार बोगस प्रमाणपत्रे काढून ही संधीच हिरावून घेत असतील, तर आरक्षण वाचले असे कसे म्हणायचे? असा संतप्त सवाल ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केला आहे. याचसोबत त्यांनी राष

.

लक्ष्मण हाके म्हणाले की, बबनराव तायवाडे उन्ह खात वृद्ध झाले आहेत का? ते नक्की कोणत्या ओबीसींचे प्रतिनिधित्व करतात, हे त्यांनी स्पष्ट करावे. बुलढाणा जिल्ह्यात ओबीसींसाठी आरक्षित असलेल्या 17 जागांपैकी केवळ 2 जागा मूळ ओबीसींना मिळाल्या, उर्वरित 15 जागा कोणी घेतल्या? याचा त्यांनी आधी अभ्यास केला पाहिजे. आज आमचे हक्क आणि अधिकार संपले आहेत. आम्ही अजून पोटाच्या प्रश्नातून बाहेर पडलेलो नाही, केवळ जगायचे म्हणून अन्न खात आहोत, अशी आमच्या समाजाची बिकट अवस्था झाली आहे.

यापुढे मूळ ओबीसी दिसणार नाही

लक्ष्मण हाके म्हणाले की, ओबीसी यापुढे कुठेही दिसणार नाही.तिथे मराठा कुणबीच दिसतील. मराठा समाजाला एसीबीसीचे 10 टक्के, EWS मध्ये, ओपन, आणि ओबीसीमध्ये सुद्धा त्यांनाच आरक्षण मिळत आहे.

शासन-प्रशासनाने आमची दखल घेतली नाही

लक्ष्मण हाके म्हणाले की, शासन-प्रशासनाने आमची दखल घेतली असती तर आम्हाला रस्त्यावर येण्याची वेळच आली नसती. शासनाकडून एक बाजू ऐकूण घेतली जा आहे. ती बाजू ऐकत अनेक जीआर पारित करत निर्णय घेतले जात आहेत. मंत्रिमंडळाचे शिष्टमंडळ आंतरवाली सराटीकडे वेळोवेळी पोहोचत आहे. पण ओबीसींचा आवाज शासन दरबारी ऐकला जात नाही.लोकशाहीमध्ये आमचे म्हणण मांडण्याचा आम्हाला अधिकार देण्यात आला आहे. जर आंदोलनातून अराजकता निर्माण होत असेल तर वेगळी गोष्ट आहे पण आम्ही केवळ ओबीसींच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत.

निर्णय घेताना परिणाम काय हे पाहिले पाहिजे

लक्ष्मण हाके म्हणाले की, महाराष्ट्र सरकार ओबीसींसोबत कसे वागते आहे हे समाज पाहतो आहे. मनोज जरांगे यांना भेटण्यासाठी आजी-माजी आमदार, मंत्री नेहमी जात असतात. प्रसाद लाड यांनी चॉपर विकत घेतले आहे ते त्यासाठीच. एखाद्या आंदोलकाचे किती लाड करायचे, तुम्ही एखादा निर्णय घेतात त्यावेळी त्याचा परिणाम ओबीसी घटकावर काय होणार आहे हे पण पाहिले पाहिजे.

हे ही वृत्त वाचा मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 5 वा दिवस:जरांगेंची प्रकृती खालावली, पण भूमिकेवर ठाम, अनेक जिल्ह्यात आंदोलनाचे पडसाद

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज 5 वा दिवस आहे. प्रकृती खालावलेली असतानाही जरांगे पाटील आपल्या उपोषणाच्या भूमिकेवर ठाम आहेत. मंगळवारी रात्री जालन्याच्या जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी उपोषणस्थळी भेट देऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.