![]()
“भाजपमध्ये आता 80 टक्के मूळचा भाजप राहिलेला नाही. काँग्रेस आणि इतर पक्षांमधील लोक आता भाजपमध्ये आले आहेत. आम्ही ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, तेच आज मुख्यमंत्र्यांसोबत बसलेले दिसतात,” असे खडसे म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमाला विविध राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. मात्र, भाजपकडून मोजके नेते वगळता फारसा प्रतिसाद मिळाला नाही. याबाबत खडसे यांनी खंत व्यक्त करत भाजपच्या सध्याच्या राजकीय वाटचालीवर भाष्य केले. एकनाथ खडसे म्हणाले की, भारतीय जनता पार्टीमध्ये मी 40 ते 50 वर्षे मेहनत केली आहे. पक्षासाठी काम केले आहे. लग्न असो, मरण असो किंवा वाढदिवसाचा कार्यक्रम असो, अशा प्रसंगी सर्व भेदभाव विसरून आपण एकमेकांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतो. त्यामुळे माझ्या वाढदिवसाला काही लोकांनी यावे, अशी माझी इच्छा होती. मात्र, येणे किंवा न येणे हा त्यांच्या मर्जीचा प्रश्न आहे. ते येऊ शकले नाहीत, याचे मला दुःख आहे,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली. मात्र, भाजपमधील काही नेते अनुपस्थित असतानाही आपल्या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात जनतेचा प्रतिसाद मिळाल्याचे खडसे यांनी सांगितले. “माझ्या कार्यक्रमाला किती मोठा प्रतिसाद मिळाला, हे आपण सर्वांनी पाहिले आहे. एवढ्या मोठ्या प्रमानात या ठिकाणी जनता पहिल्यांदाच एकत्र आली,” असे ते म्हणाले. ‘भाजपला नाथाभाऊ नको आहे, असे नाही; काही विशिष्ट लोकांना मी नको आहे’ एकनाथ खडसे पुढे म्हणाले की, “भाजपला नाथाभाऊ नको आहेत, असे नाही; मात्र पक्षातील काही विशिष्ट नेत्यांना मी नको आहे,” असे स्पष्ट करत त्यांनी भाजपमधील अंतर्गत परिस्थितीवर भाष्य केले. तसेच, इतर पक्षांमधून भाजपमध्ये आलेल्या अनेकांना भाजपची विचारधारा आणि पक्षाची वाटचाल काय आहे, याची माहितीही नाही, अशी टीका त्यांनी केली. “आज माझा वाढदिवस आहे. त्यामुळे मला कोणावरही टीका-टिप्पणी करायची नाही. गेल्या ४०-५० वर्षांपासून मी भारतीय जनता पार्टीमध्ये काम केले आहे. पक्षासाठी अनेक वर्षे मेहनत घेतली आहे. त्यामुळे पक्षात झालेले बदल आणि सध्याची परिस्थिती याबाबत माझ्या काही भावना आहेत,” असेही खडसे यांनी सांगितले. राज्यातील शेतकरी अडचणीत एकनाथ खडसे म्हणाले, यंदा राज्यातील अनेक भागांत अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. या आठवड्यात पाऊस पडण्याचा अंदाज आहे. हा पाऊस झाला तर आनंदाची बाब आहे. मात्र, पाऊस न झाल्यास सरकारने पुढे येऊन अशा संकटग्रस्त शेतकऱ्यांना मदत करायला हवी. पाऊस नसल्यामुळे अनेक शेतकरी आपली शेती नांगरून टाकण्याच्या विचारात आहेत. परिस्थिती आणखी गंभीर झाल्यास काही शेतकरी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू शकतात. हे लक्षात घेता सरकारने शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची गरज असल्याचे खडसे यांनी सांगितले. दरम्यान, मनोज जरांगे यांच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनावरही खडसे यांनी भाष्य केले. सरकार आणि मनोज जरांगे यांच्यात चर्चा सुरू आहे. या चर्चेतून काहीतरी मार्ग निघेल, अशी अपेक्षा असल्याचेही एकनाथ खडसे यांनी म्हटले. हेही वाचा.. महिला आरक्षणाचे जनक आम्हीच:RSS महिलेला सरसंघचालक करणार का? पृथ्वीराज चव्हाणांची टीका, पेपरफुटी-कुंभमेळा भ्रष्टाचारावरून सरकारला घेरले काँग्रेसने महिला आरक्षण विधेयकाला कधीही विरोध केलेला नाही, उलट काँग्रेसच महिला आरक्षणाची खरी जनक आहे, असा जोरदार पलटवार महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. नाशिकमध्ये काँग्रेसच्या 10 दिवसीय प्रशिक्षण शिबिराच्या प्रसंगी माध्यमांशी बोलताना त्यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) अत्यंत बोचऱ्या शब्दांत टीका केली. तसेच, राज्यातील पेपरफुटी, नाशिक कुंभमेळ्यातील संभाव्य भ्रष्टाचार आणि 1 लाख कोटींच्या शक्तिपीठ महामार्गातील कमिशनखोरीवरून त्यांनी महायुती सरकारवर गंभीर आरोप केले.सविस्तर वाचा..
Source link
भाजपमध्ये 80 टक्के मूळचा भाजप राहिलेला नाही:ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, तेच आज मुख्यमंत्र्यांसोबत – एकनाथ खडसे