Headlines

सटाण्यात 500 विद्यार्थ्यांनी साकारले‎शाडू मातीपासून पर्यावरणपूरक बाप्पा‎:नगरपरिषद, रोटरी क्लब व लोकनेते पाटील मराठा स्कूल‎तर्फे कार्यशाळा




येथील मराठा विद्या प्रसारक समाज संचलित लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालयात ‘दिव्य मराठी’च्या पर्यावरणपूरक गणेशोत्सव मोहिमेला प्रतिसाद देत शाडू मातीपासून गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा उत्साहात पार पडली. लायन्स क्लब ऑफ सिन्नर सिटीच्या सहकार्याने आयोजित या उपक्रमात २०० हून अधिक विद्यार्थ्यांनी पर्यावरणस्नेही बाप्पाच्या देखण्या मूर्ती साकारल्या. स्वतः बनवलेल्या या मूर्तींची यंदा घरात प्राणप्रतिष्ठा करण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी केला. प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) आणि रासायनिक रंगांच्या मूर्तींमुळे नद्या, तलावांमधील पाण्याचे पीएच प्रमाण बिघडून जलीय परिसंस्थेला मोठा धोका निर्माण होतो. पीओपी पाण्यात विरघळण्यास कित्येक महिने लागतात, तर शाडू माती अवघ्या काही तासांत पाण्यात विरघळून निसर्गात मिसळते. यामुळे जलप्रदूषण १०० टक्के रोखण्यास मदत होते, असे मुख्याध्यापक रामढोली यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. कार्यशाळेत विद्यार्थ्यांना शाडू मातीचे महत्त्व, मूर्तीचे आकारमान आणि नैसर्गिक रंगांचा वापर याविषयी प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पकतेतून विविध आकारांच्या आकर्षक गणेशमूर्ती साकारल्या. कार्यशाळेत भाग्यश्री मोरे (प्रथम), माधवी कोकणे (द्वितीय), संस्कृती राऊत (तृतीय) तर धनश्री सांगळे व रवीना वाघ (उत्तेजनार्थ) यांनी उत्कृष्ट मूर्ती साकारून बक्षिसे पटकावली. मविप्रचे तालुका संचालक कृष्णाजी भगत यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम झाला. कलाशिक्षक राहुल पगारे, परेश जुमानके, मिलिंद डावरे, छाया खालकर व तृप्ती पगार यांनी विद्यार्थ्यांना मूर्तीकलेचे बारकावे शिकवले. नागरिकांनाही पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. लायन्स क्लबच्या अध्यक्षा स्मिता थोरात यांच्यासह पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते. प्रतिनिधी | सटाणा ‘दिव्य मराठी’च्या पर्यावरणपूरक गणेशोत्सव मोहिमेला प्रतिसाद देत येथील नगरपरिषद, रोटरी क्लब ऑफ सटाणा आणि लोकनेते स्व. पंडितराव धर्माजी पाटील मराठा इंग्लिश स्कूल यांच्या वतीने शाडू मातीपासून गणेशमूर्ती बनविण्याची एकदिवसीय कार्यशाळा पार पडली. लोकनेते स्व. पंडितराव धर्माजी पाटील मराठा इंग्लिश स्कूल व जिजामाता गर्ल्स हायस्कूल येथे झालेल्या या कार्यशाळेत ५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. मूर्तिकार किशोर सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना शाडू मातीपासून गणेशमूर्ती तयार करण्याचे प्रात्यक्षिक देत मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनानुसार विद्यार्थ्यांनी आपल्या चिमुकल्या हातांनी गणेशमूर्ती साकारत पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश दिला. स्वतःच्या हाताने बाप्पाची मूर्ती घडविण्याचा अनुभव विद्यार्थ्यांसाठी आनंददायी व प्रेरणादायी ठरला. गणेशोत्सवाच्या काळात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींमुळे होणारे जलप्रदूषण टाळणे, शाडू मातीच्या पर्यावरणपूरक मूर्तींचा वापर वाढविणे आणि पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करणे, हा कार्यशाळेचा प्रमुख उद्देश होता. मुख्याधिकारी ज्योती भगत यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम राबविण्यात आला. ‘मातीचा बाप्पा, पर्यावरणाचा सन्मान’ या संकल्पनेतून विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची दिशा समाजासमोर ठेवली आहे. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करण्याबरोबरच त्यांच्या माध्यमातून हा संदेश संपूर्ण समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न असल्याचे नगराध्यक्ष हर्षदा पाटील यांनी सांगितले. सूत्रसंचालन शेखर दळवी यांनी केले. यावेळी उपनगराध्यक्ष सोनाली बैताडे, नगरसेवक सुमित वाघ, मंगेश खैरनार, विलास दंडगव्हाळ, मनीषा पाकळे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *