Headlines

सीना पात्रात अतिक्रमण; नेप्तीमध्ये "रास्ता रोको':कारवाई न झाल्यास आत्मदहनाचा इशारा‎




अहिल्यानगर तालुक्यातील नेप्ती परिसरातील चांदपेर वस्ती येथे सीना नदीपात्रात (जामगाव नाला) झालेल्या अतिक्रमणाविरोधात ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. नदीच्या नैसर्गिक प्रवाहाला अडथळा निर्माण करणाऱ्या या अनधिकृत बांधकामावर तात्काळ कारवाई करावी, या मागणीसाठी ग्रामस्थांनी बुधवारी (२ सप्टेंबर) छत्रपती इंजिनिअरिंग कॉलेजसमोर रस्ता रोको आंदोलन केले. आंदोलनाची माहिती मिळताच अहिल्यानगर तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली व ग्रामस्थांची समजूत काढली. यानंतर तहसील कार्यालयाकडून ग्रामस्थांना लेखी आश्वासन देण्यात आले. त्यानुसार, ८ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ग्रामस्थांची विशेष बैठक घेतली जाईल आणि अतिक्रमण हटविण्याबाबत अंतिम तोडगा काढला जाईल. प्रशासनाच्या या लेखी आश्वासनानंतर ग्रामस्थांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले. नदीचा प्रवाहच बदलला मुसळधार पाऊस झाल्यानंतर सीना नदीला दरवर्षी मोठा पाऊस होतो. काही जणांनी अतिक्रमण केल्याने नदीचा प्रवाहच ३०० ते ४०० फुटांपर्यंत बदलला गेला आणि नेप्ती परिसरातील जवळपास ५० ते ६० शेतकऱ्यांच्या शेतात नदी वाहत आहे. गतवर्षी तर अल्पभुधारक शेतकऱ्यांच्या शेतातील मातीच वाहून गेली. प्रशासनाला वारंवार सांगूनही यावर तोडगा न निघाल्याने रास्ता रोको करण्यात आले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *