Headlines

राऊतांना उबाठाचे प्रतिपक्षप्रमुख नाही तर पक्षप्रमुख व्हायचंय:ठाकरेंचे 13 ते 14 आमदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात, नवनाथ बन यांचा दावा




उबाठाचे 13 ते 14 आमदार हे उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंसोबत जायला तयार झाले आहेत, राऊतांनी त्याकडे लक्ष दिले पाहिजे नाहीतर उद्या उठून पुन्हा बोंब मारतील की आमचे खासदार, आमदार आणि नगरसेवक पळवले, असा टोला भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी उबाठाला लगावला आहे. नवनाथ बन म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या नेतृत्वामध्ये देश पुढे जात आहे. त्यांचा राजीनामा कोणीही मागितला नाही. भाजपमध्ये देश प्रथम ही भावना घेत काम केले जाते. उबाठासारखे आदित्य ठाकरेविरुद्ध संजय राऊत असे काही भाजपमध्ये होत नाही, असा टोला बन यांनी उबाठाला लगावला आहे. उबाठामध्ये संजय राऊत मग उद्धव ठाकरे, आणि शेवटी आदित्य ठाकरे असे सुरू आहे, राऊतांना पक्षप्रमुख म्हणून पक्ष ताब्यात घ्यायचा आहे. तुम्ही आता प्रतिपक्षप्रमुख म्हणून काम करत आहे. उबाठाचा खंडणी वसुलीचा व्यवसाय नवनाथ बन म्हणाले की, व्यवसाय काय हे ठाकरेंना चांगलेच माहिती आहे. खंडणी वसूल करणे, खिचडीमध्ये घोटाळा करणे, सामनामध्ये कमिशनखोरी करणे याला व्यवसाय म्हणतात ही सर्व कामे राऊत करत असतात. राम मंदिरामध्ये काही चुकीचे झाले त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. आता सीईओमार्फत तिथे पारदर्शक काम करण्यात येणार आहे. काँग्रेसने मविआचा पाठिंबा काढून घेऊ नये म्हणून उबाठाचे लोकं राममंदिराच्या सोहळ्याला गेले नाही तुम्ही राममंदिरावर बोलूच नका. राऊतांनी खासदारकीची चिंता करावी नवनाथ बन म्हणाले की, राहुल गांधी यांच्याकडून भीक मागत संजय राऊत यांना 2028 मध्ये खासदारकीची उमेदवारी घ्यावी लागणार आहे. कारण आदित्य ठाकरे यांचा पत्ता कट करण्यासाठी बसले आहेत. ज्या पद्धतीने राऊतांनी शरद पवारांचे नाव पुढे करत प्रियांका चतुर्वेदी यांचा पत्ता कट केला तसेच तसेच आदित्य ठाकरे तुमचा पत्ता कट करण्यासाठी तयार आहेत. राऊतांनी खासदारकीची चिंता करावी देशाची चिंता करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस हे अतिशय सक्षम आहेत. सुळेंना केवळ वांग्याची शेती माहिती नवनाथ बन म्हणाले की, सुप्रिया सुळेंना लोकांनी निवडून दिले असून त्यांना देशाचा प्रोटोकॉल माहिती आहे.परंतू त्या दुर्दैवाने अमित ठाकरेंचे समर्थन करतात. सुळेंना वांग्यातून करोडो रुपये कसे कमवायचे हेच माहिती आहे, त्यांना प्रोटोकॉलचा विसर पडला आहे. वांग्यातून इतके पैसे कसे कमावता येतात ते त्यांनी जनतेला सांगितले पाहिजे. गजानन काळेंना महत्त्व देण्याची गरज नाही नवनाथ बन म्हणाले की, गजानन काळे यांना महत्त्व देण्याची गरज नाही त्यांच्यावर महिलेंची छेडछाड केल्याचा आरोप आहे. त्यांचे तोंड आधीच काळे झाले आहे, त्यांना साधे नगरसेवक होता येत नाही ते पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करतात. त्यांच्या मालकांच्या मुलाची दादरमध्ये अनामत रक्कम वाचवता आली नाही त्यांनी शहांवर बोलूच नये.

हे ही वृत्त वाचा

फडणवीसांना दिल्लीत बोलावून उपपंतप्रधानपद देण्याची शक्यता:गृहमंत्री कधीच पंतप्रधान होत नाही, संजय राऊतांचे मोठे विधान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत बोलावून एक मोठी जबाबदारी द्यायची आहे. दिल्लीबाहेर असलेल्या एका नेत्याची उपपंतप्रधानपदी निवड केली जाण्याची शक्यता आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचीही हीच भूमिका असल्याचा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *