![]()
विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी श्रीरामपूर पोलिस ठाणे, शिर्डी वाहतूक शाखा व श्रीरामपूर परिवहन विभागाच्या संयुक्त पथकाने गुरुवारी विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या स्कूल बससह अन्य वाहनांची विशेष तपासणी मोहीम राबविली. या मोहिमेत एकूण ६६ व
.
अप्पर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, पोलिस उपअधीक्षक जयदत्त भवर, पोलिस निरीक्षक विशाल खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. सहायक निरीक्षक चेतन लोखंडे, लहाने, चव्हाण, सहायक मोटार वाहन निरीक्षक सागर पुंड, सागर नन्नवरे, वाहतूक शाखेचे सहायक फौजदार नितीन सोनवणे, अनिल लांडे, गायकवाड आदींच्या पथकाने तपासणी केली. तपासणीदरम्यान वाहनांचा फिटनेस, परवाना, विमा, परमिट, प्रदूषण प्रमाणपत्र, चालकाचा परवाना, वाहनातील सुरक्षा साधने, अग्निशामक यंत्र, प्रथमोपचार पेटी, आपत्कालीन दरवाजा, सीसीटीव्ही, जीपीएस सुविधा आणि वेगमर्यादा आदींची पाहणी करण्यात आली. चालक मद्य किंवा अमली पदार्थांच्या नशेत वाहन चालवत नाही ना, याचीही तपासणी करण्यात आली. तसेच क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी वाहतूक, धोकादायक पद्धतीने वाहन चालविणे व अन्य नियमभंगाच्या बाबी तपासल्या.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर मोटार वाहन कायदा व संबंधित नियमांनुसार कारवाई करण्यात आली. काही चालकांना नियमांचे काटेकोर पालन करण्याबाबत समज देऊन सोडण्यात आले.
अशी झाली कारवाई . लायसन नॉट कॅरी : २ .पीयूसी नसणे : १ .चालक युनिफॉर्म : १ .क्षमतेपेक्षा अतिरिक्त विद्यार्थी : ६ .अग्निशामक यंत्र : ६ .प्रथमोपचार पेटी : ५ .फिटनेस : २ .आपत्कालीन दरवाजा सुस्थितीत नसणे : ३ .सेफ्टी काचा व जाळी : २ .एकूण ३३ वाहनांवर दंडात्मक कारवाई