Headlines

मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा 7 वा दिवस:जरांगेंच्या मागण्या मान्य, सरकारने मुदत मागितल्याने उपोषण कायम




मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज 7 वा दिवस आहे. राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगे पाटील यांची आंतरवाली सराटी येथे रात्री भेट घेतली. त्यांच्यासोबत 3 तास चर्चा केली. जरांगे पाटील यांनी केलेल्या मागण्या त्यांनी मान्य केल्या व उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मात्र, जरांगेंनी मागण्यांवर तात्काळ कार्यवाहीचा आग्रह धरला. त्याची पूर्तता करण्यासाठी 11 सप्टेंबरपर्यंत सरकारने मुदत मागितली. त्यामुळे जरांगेंनी उपोषण कायम ठेवले. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, आमदार प्रसाद लाड, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल आदी उपस्थित होते. दरम्यान, जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत तसेच राज्यातील अनेक जिल्ह्यांत बंदची हाक देण्यात आली होती, त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अनेक ठिकाणी रास्ता रोकोसह विविध आंदोलने करण्यात आली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *