Headlines

महापुरुषांचा आदर्श घेत यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करा:इयत्ता चौथीमधील विद्यार्थ्यांना पदवीने केले सन्मानित, अनोख्या उपक्रमाचे होतेय कौतुक‎




प्रतिनिधी|अहिल्यानगर स्पर्धा करायची ती स्वतःशी करायची. काल मी काय होतो आज मी काय आहे उद्या मला काय व्हायचंय ही स्पर्धा आपल्या मनामध्ये कायमस्वरूपी असली पाहिजे. महापुरुषांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जीवनात यशस्वी होण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले पाहिजेत, असे प्रतिपादन निवृत्त प्राचार्य खासेराव शितोळे यांनी केले. हिंद सेवा मंडळाच्या बागडपट्टी विभागातील प्राथमिक शाळेत इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांना उद्योजक श्रीगोपाल जाखोटिया यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदवी देऊन सन्मानित आले. सुमतीलाल कोठारी यांची हिंद सेवा मंडळाचे नुतन कार्याध्यक्षपदी व विलास बडवे यांची उपाध्यक्षपदी निवड झाली म्हणून विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख उपस्थितीत निवृत्त प्राचार्य खासेराव शितोळे, हिंद सेवा मंडळाचे कार्याध्यक्ष सुमतीलाल कोठारी, उपाध्यक्ष विलास बडवे, शाळेचे चेअरमन मधुसूदन सारडा, मेहेर इंग्लिश स्कूलचे चेअरमन जगदिश झालानी, शालेय समिती सदस्य रविंद्र गुजराती, विष्णू सारडा, लक्ष्मीनिवास सारडा, मुख्याध्यापक विठ्ठल उरमुडे आदी उपस्थित होते. जाखोटिया म्हणाले, मी हिंद सेवा मंडळाचा विद्यार्थी आहे. या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शाळेचे चेअरमन मधुसूदन सारडा व मुख्याध्यापक विठ्ठल उरमुडे हे शाळेतील विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक उपक्रम राबवीत असतात. त्यामुळे शाळेची प्रगती वेगाने होत आहे. सुमतीलाल कोठारी म्हणाले, चौथीच्या विद्यार्थ्यांच्या पदवीदान समारंभ प्रथमच पाहत आहे. हिंद सेवा मंडळाची प्राथमिक शाळेत नेहमीच नवनवीन उपक्रम राबविण्यात येतात. मधुसूदन सारडा म्हणाले, शाळेतील विद्यार्थ्यांची दरवर्षी स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेतली जाते. प्रज्ञाशोध परीक्षा, स्टुडन्ट टॅलेंट सर्च, डॉ.हेडगेवार प्रतिष्ठानची स्पर्धा परीक्षा अशा विविध स्पर्धा परीक्षांमध्ये राज्यात व जिल्ह्यात शाळेतील विद्यार्थी चमकले आहेत. शाळेतील विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी हिंदसेवा मंडळाचे सर्व पदाधिकारी नेहमीच सहकार्य करीत असतात. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक विठ्ठल उरमुडे यांनी केले. आभार गौरी ब्रम्हे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनिषा साळी, धाडगे अरुणा, पोतदार विद्या, अभिजित जवादे, जंगम मनिषा, चावरे कल्पना, सोनाली मच्चा, सपना धोत्रे, अर्चना वाकचौरे, अर्चना परभणे, माधुरी धायतडक, संदीप कळसकर, नंदा देवतरसे, दिपाली कोल्हे आदींनी परिश्रम घेतले. यावेळी शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळेच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *