Headlines

ग्रामदैवत विशाल गणेशाला ११ हजार १११ आंब्यांचा नैवेद्य:सकाळी अभिषेक दुपारी महापूजा करुन आरती




प्रतिनिधी|अहिल्यानगर शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिरात अक्षय तृतीयानिमित्त श्री विशाल गणेशाला १११११ आंब्यांचा नैवेद्य दाखवून आंब्यांची सजावट करण्यात आली होती. सकाळी अभिषेक करण्यात आला. दुपारी उद्योजक नरेंद्र फिरोदिया, छाया फिरोदिया, आशा फिरोदिया, अनुष्का फिरोदिया, गौरव भंडारी, काव्या फिरोदिया यांच्या हस्ते महापूजा करुन आरती करण्यात आली. याप्रसंगी पुजारी संगमनाथ महाराज, देवस्थानचे उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे, सचिव अशोक कानडे, ज्ञानेश्वर रासकर, विजय कोथिंबिरे, प्रा. माणिकराव विधाते, नितीन पुंड, गणेश राऊत आदी उपस्थित होते. खरपुडे म्हणाले, ‘अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. या दिवसाला साडेतीन मुहूर्तांतील एक मुहूर्त मानले जाते. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सातत्याने सुख-समृद्धी प्राप्त करून देणाऱ्या देवतेची कृतज्ञतेचा भाव ठेवून उपासना केल्यास देवतेच्या कृपादृष्टी कायम आपल्यावर राहते. या काळात केलेले दानही सर्वात पवित्र मानले जाते. यावेळी प्रा. माणिकराव विधाते यांनी देवस्थानच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. दानशूर भाविकांचे आभार मानले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *