Headlines

फास्टट्रॅक न्यायालयात खटला चालवून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी:भर पावसात राजापेठ ठाण्यावर धडकले नागरिक; आमदार रवी राणांची हजेरी‎



राजापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रवीनगर परिसरात गुरुवारी ३ सप्टेंबरला वर्दळीच्या रस्त्यावर एका साडेसतरा वर्षीय अल्पवयीन मुलीचा क्रूरपणे खून करण्यात आला. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण संतापाचे वातावरण पसरले आहे. हे दुष्कृत्य करून दहशत माजवणाऱ्या मारे

.

विशेष म्हणजे, या वेळी पाऊस सुरू असतानाही नागरिकांनी पावसात भिजत आपल्या मागण्या लावून धरल्या होत्या. अल्पवयीन विद्यार्थिनी ही आपल्या घरातून महाविद्यालयात जाण्यासाठी निघाली होती. मात्र, ती महाविद्यालयात पोहोचण्यापूर्वीच आनंद भड याने एकतर्फी प्रेमातून तिच्यावर अत्यंत क्रूरपणे हल्ला केला. या घटनेमध्ये मृत मुलीच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून शहरातील महिला व मुलींच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. नागरिकांचा वाढता आक्रोश आणि गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी स्वतः राजापेठ पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी नागरिकांचे म्हणणे शांततेने ऐकून घेतले. या प्रकरणाचा तपास करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट आश्वासन दिले. हा संपूर्ण घडामोडींचा क्रम सुरू असताना पाऊस पडत होता; मात्र पोलीस अधिकारी, नागरिक पावसात भिजतच या गंभीर विषयावर चर्चा करत होते.

नागरिकांच्या प्रमुख मागण्या या प्रकरणातील मुख्य मारेकऱ्याला फाशीचीच शिक्षा देण्यात यावी. हा संपूर्ण खटला फास्टट्रॅक (जलदगती) न्यायालयात चालवून आरोपीला लवकरात लवकर कडक शिक्षा दिली जावी. घटनेचा अत्यंत सखोल आणि निष्पक्ष तपास करण्यात यावा. शहरात, विशेषतः शैक्षणिक परिसर व वर्दळीच्या ठिकाणी महिला पोलिसांची आणि सामान्य पोलिसांची गस्त मोठ्या प्रमाणावर वाढवण्यात यावी, जेणेकरून विद्यार्थिनी व तरुणींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होणार नाही.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *