![]()
मालाड येथील मालवणी परिसरात शनिवारी दुपारी दहीहंडीचा दोर बांधलेला विटांचा खांब कोसळून सात वर्षांच्या रुद्र कदमचा मृत्यू झाला. दुसऱ्या घटनेत ४ सप्टेंबर रोजी रात्री साडेदहा वाजता पुण्यातील जुनी सांगवी परिसरात दहीहंडी उत्सवासाठी उभारण्यात आलेल्या स्टेजची लोखंडी कमान अंगावर पडल्याने सलमा सलाउद्दीन पठाण (४५) यांचा मृत्यू झाला. दरम्यान, मुंबईत हंडी फोडताना व मानवी मनोरे रचताना ११८ गोविंदा तर ठाण्यात १० गोविंदा जखमी झाले. ८० गोविंदांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. प्राथमिक उपचारानंतर ३३ गोविंदांना घरी सोडण्यात आले आहे. मुंबई पोलिसांनी सांगितले की, मालवणीत हंडी फोडताना हंडीच्या दोराला बांधलेला खांब रुद्रच्या डोक्यावर कोसळला. पुणे पोलिसांच्या म्हणण्यानुसार विघ्नहर्ता मित्रमंडळात सलमा यांचा मुलगा कार्यकर्ता आहे. त्यामुळे त्या पतीसोबत दहीहंडी उत्सवासाठी आल्या होत्या. शुक्रवारी रात्री दहा वाजता स्टेजभोवतीचा लोखंडी सांगाडा उतरवताना कमानीचा लोखंडी अँगल त्यांच्या अंगावर पडला. पठाण यांचा मुलगा विघ्नहर्ता मित्रमंडळाचा कार्यकर्ता असल्यामुळे पठाण कुटुंबीयांनी मंडळाविरुद्ध पोलिसात तक्रारीस नकार दिला. मुंबई, ठाण्यात १० वा थर लावण्याची गोविंदांत चुरस मुंबई आणि ठाण्यात लाखोंच्या बक्षिसांच्या दहीहंड्या आयोजित करण्यात आल्याने गोविंदा पथकांमध्ये ९ ते १० थर लावण्याची मोठी चुरस पाहायला मिळाली. मागाठाणे येथील आमदार प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडीत ‘ओम साई’ पथकाने ९ थरांची यशस्वी सलामी दिली. तर ठाण्यात आमदार प्रताप सरनाईक यांच्या दहीहंडीत ‘आर्यन्स गोविंदा पथका’ने १० थर रचले. मात्र १० वा थर पूर्ण उभा राहण्यापूर्वीच संपूर्ण मनोरा कोसळला. ठाण्यात मनसेच्या अविनाश जाधव यांच्या दहीहंडीत साईराम गोविंदा पथकाने १० थरांची सलामी दिली. दहीहंडी : मुंबई परिसरात ११८ तर ठाण्यात १० गोविंदा जखमी शनिवारी राज्यभरात दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. दादर येथे महिलांच्या गोविंदा संघाने पाच मिनिटांत ५० फूट उंचीवरील हंडी फोडली. मुंबई आणि ठाण्यात हंडी फोडण्यासाठी गोविंदांत दिवसभर स्पर्धा रंगली होती. बोरिवली पूर्व येथील मागाठाणे येथे विजेत्यासाठी ८५ लाख रुपयांचे सर्वात मोठे बक्षीस ठेवण्यात आले होते.
Source link
मुंबईमध्ये 7 वर्षीय मुलाचा तर पुण्यात 45 वर्षीय महिलेचा मृत्यू:मुंबई… 5 मिनिटांत फोडली 50 फूट उंचीवरील हंडी; सर्वात मोठे बक्षीस 85 लाख रुपयांचे