![]()
मी बारावीपर्यंत या शाळेत शिकलो. इथल्या सर्व गुरुजनांनी आम्हाला चांगले मार्गदर्शन केले संस्कार केले उच्च ध्येय दाखवले माझ्या काळातील सर्व विद्यार्थी आज मोठ्या पदावर आहेत. ही दैदीप्यमान परंपरा आजही तशीच कायम आहे. राष्ट्रपतींनी गुणवत्तापूर्ण सेवेसाठी मल
.
शिक्षकांमुळे मी घडलो असून, मला माझ्या प्रशालेचा अभिमान वाटतो, असे गौरवोद्गार सोलापूरचे सहायक पोलिस आयुक्त व राष्ट्रपती पोलिस पदक विजेते मनोजकुमार यादव यांनी केले. ते इंग्लिश स्कूल मंगळवेढा येथे शिक्षक दिनानिमित्त आयोजित गुणवंत विद्यार्थी आणि शिक्षक सन्मान सोहळ्याप्रसंगी बोलत होते. तत्पूर्वी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सहायक पोलिस आयुक्त मनोज कुमार यादव, संगीता यादव, शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेचे अध्यक्ष ॲड. सुजित कदम, उपाध्यक्ष डॉ. सुभाष कदम, संस्थेच्या अकॅडमिक अध्यक्षा डॉ. मीनाक्षी कदम, सचिव डॉ.प्रियदर्शनी महाडिक,मारापूरचे सरपंच विनायक यादव,माजी पंचायत समिती सदस्य नवनाथ पवार आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ.मीनाक्षी कदम म्हणाल्या, शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी उज्वल यश प्राप्त केले असून,संस्थेसाठी हा अभिमानाचा क्षण आहे तसेच आई वडिलांसमोर झालेल्या कौतुकाची बरोबरी कशाशीही होऊ शकत नाही.आजही पालकांचा विश्वास कायम आहे.विद्यार्थी कष्ट करतात त्यांना आम्ही योग्य मार्गदर्शन करतो असे सांगून त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्राचार्य रवींद्र काशिद यांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी संस्था उपक्रमशील असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन गोरीमा शेख व बालाजी शिंदे यांनी केले.
शिक्षक दिनानिमित्त प्रशालेतील यांचा झाला सन्मान शिक्षक दिनानिमित्त प्रशालेत सीए पियुष गवळी, कनिष्ठ अभियंता संकेत माने, एमबीबीएससाठी प्रवेश मिळालेले ज्ञानेश्वरी माने, आदित्य दुधाळ, अस्मिता चेळेकर, दहावी बोर्डात राज्य प्रथम स्वर्णश्री पाटील यांचा सन्मान करण्यात आला. तसेच शिष्यवृत्ती मार्गदर्शक शिक्षक वाल्मीक मासाळ, तुकाराम हजारे, व्यंकटेश माळी, कल्पना जोशी, ज्योती पाटील, संतोष चव्हाण, सतीश सावंत, एस. पी. माळी, शिवाजी भोसले, नर्गिस इनामदार तसेच एनएमएमएस परीक्षा मार्गदर्शक शिक्षक धनाजी लवटे, चंद्रकांत मोराळे, दहावी मार्गदर्शक शिक्षक विजय गवळी, सी. व्ही. जगताप, सुजाता अडसूळ, प्राजक्ता ताड, गोरीमा शेख त्याचबरोबर मंगळवेढा नगरपालिका शिष्यवृत्ती मार्गदर्शक शिक्षक अर्जुन अवताडे, विशाल गायकवाड, भारती धनवे, ज्योती कलुबर्मे इत्यादी .