![]()
बार्शी-लातूर रस्त्यावर जामगाव (आ.) येथे शेतकरी संघटनेने विविध मागण्यांसाठी सुमारे १ तास रास्ता रोको आंदोलन केले. प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. दुष्काळ जाहीर करून मागील वर्षी वगळलेले महत्त्वाचे ट्रिगर पुन्हा लागू करा, स्मार्ट मीटर बसवणे बंद करा अन्यथा शेतातील विद्युत खांब व डीपीचे आज पर्यंतचे भाडे द्या, उजनी कॅनॉलच्या पाण्याने अर्धा किलोमीटर अंतरातील तीन धरणे भरा, बायपास पासून पुढे फक्त सात मीटर संपादन असल्यामुळे मोबदला वाढवून द्या, पीक विमा कंपन्यांची त्यांच्या स्थापनेपासून तर राज्य प्रमुख आवटे आणि कृषी आयुक्तांच्या संपत्तीची न्यायालयीन चौकशी करा, चालू खरिपाची नुकसान भरपाई व मागील आणि चालूचा पीक विमा द्या आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.
Source link
दुष्काळ जाहीर करा, वगळलेले ट्रिगर द्या:शेतकरी संघटनेचा रास्ता रोकोदरम्यान काम, विद्युत डीपीचे कामही अद्यापी अपूर्णच