Headlines

लग्नाला नकार दिल्याने एकाकडून मुलीची बदनामी:सायबर पोलिसांनी तांत्रिक तपासातून आरोपीचे कारस्थान




विवाहाचा प्रस्ताव धुडकावल्याच्या रागातून एका माथेफिरू तरुणाने तब्बल १५ बनावट इन्स्टाग्राम खाती तयार करून उच्चशिक्षित तरुणीसह तिच्या नातेवाइकांची सोशल मीडियावर बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिस आयुक्त कार्यालयाच्या सायबर विभागाने तांत्रिक तपास करून संशयित आरोपी रोहित अंकुश चव्हाण (३५, रा. मंगळवार पेठ, कराड, जि. सातारा) याच्याविरुद्ध सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. तक्रारदार तरुणीचा दोन वर्षांपूर्वी घटस्फोट झाला असून ती पुण्याच्या नामांकित कंपनीत कार्यरत आहे. पुण्यात नोकरीदरम्यान तिची ओळख रोहितशी झाली होती. १४ फेब्रुवारी २०२६ रोजी त्याने तरुणीकडे लग्नाची मागणी घातली; मात्र त्याचे संशयास्पद वर्तन पाहून तरुणीच्या पालकांनी या विवाहास स्पष्ट नकार दिला. याचा राग मनात धरून रोहितने बदनामी केली. आयुक्तालयात तक्रार या त्रासाला कंटाळून तरुणीने १० ऑगस्ट रोजी पोलिस आयुक्त कार्यालयात तक्रार दिली. सायबर पोलिसांनी सर्व बनावट खात्यांचे आयपी ॲड्रेस तपासले असता हा प्रकार रोहितनेच केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार सिटीचौक पोलिसांत त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *