![]()
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या आंदोलनाचा 10 वा दिवस आहे. गेली 2 दिवस त्यांनी उपचार आणि पाणी न घेण्याचा निर्णय घेतल्याने त्यांची प्रकृती खराब झाली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू आहे. प्रकृती खालावत असतानाही जरांगे पाटील यांनी पाणी, सलाइन तसेच वैद्यकीय उपचार घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे समर्थकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सरकारच्या शिष्टमंडळाकडून अद्याप संपर्क करण्यात न आल्याने जरांगे समर्थक संतप्त झाले आहेत.त्यांनी धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वडीगोद्रीजवळील डाव्या कालव्याजवळ पाऊणतास रास्ता रोको आंदोलन केले.
Source link
मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 10 वा दिवस:पाणी अन् उपचार नाकारल्याने प्रकृती खालावली, वैद्यकीय तपासणीलाही दिला नकार