![]()
यंदाचा गणेशोत्सव शांतता, सुव्यवस्था आणि स्वच्छतेत पार पडावा, यासाठी वडोद बाजार पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सर्व सार्वजनिक गणेश मंडळांनी मंडप, ध्वनिक्षेपक तसेच मिरवणुकीसाठीची परवानगी केवळ ऑनलाइन पद्धतीनेच घ्यावी, असे आवाहन वडोद बाजार पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक (सपोनी) विजयसिंग जोनवाल यांनी केले आहे. आवाहनानुसार, गणेश मंडळांना परवानगीसाठी पोलिस ठाण्यात वारंवार हेलपाटे मारण्याची आवश्यकता राहणार नाही. शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ‘गणेशोत्सव परवानगी’ हा पर्याय निवडून आवश्यक माहिती व कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करून अर्ज सादर करावा. अर्ज सादर केल्यानंतर मिळणारा अर्ज क्रमांक जतन करून ठेवावा. त्यानंतर पोलिस ठाण्याकडून संबंधित कागदपत्रांची पडताळणी करण्यात येईल आणि नियमानुसार ऑनलाइन परवानगी देण्यात येईल.
Source link
खामगाव:गणेशोत्सव परवानगीसाठी ऑनलाइनच अर्ज करा : सपोनि विजयसिंग जोनवाल