![]()
गेल्या दीड महिन्यापासून पावसाने मारलेल्या तीव्र हुलकावणीमुळे लाडसावंगी आणि परिसर पावसाविना सुकत चालला आहे. ऐन वेळेवर पावसाने पाठ फिरवल्यामुळे या भागातील डाळिंबाचा मृग बहर पुरता धोक्यात आला असून, हाताशी आलेले पीक वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. लाखो रुपयांचा केलेला खर्च डोळ्यांसमोर मातीमोलाने जात असल्याचे पाहून परिसरातील शेतकरी प्रचंड धास्तावले आहेत. लाखो रुपयांचा खर्च पाण्यात जाण्याची भीती परिसरातील शेतकऱ्यांनी मृग बहराचे नियोजन करून डाळिंब बागांची छाटणी, खते, औषध फवारणी आणि मशागतीवर लाखो रुपयांचा भांडवली खर्च केला होता. बागा फुलोऱ्यात आणि लहान फळांच्या धारणेच्या महत्त्वाच्या टप्प्यात असतानाच पावसाने दडी मारली. विहिरी आणि कूपनलिकांच्या (बोअरवेल) पाण्याची पातळी खालावल्याने बागांना पाणी देणे अशक्य झाले आहे. फळधारणा आणि गुणवत्तेवर विपरीत परिणाम पाण्याच्या अभावामुळे झाडांवरील कळ्या आणि लहान फळे गळून पडत आहेत. जी फळे झाडावर टिकून आहेत, त्यांची वाढ खुंटली आहे. काही ठिकाणी कडक उन्हामुळे आणि पाण्याच्या ताणामुळे फळे तडकण्याचे प्रमाण वाढले आहे.
Source link
लाडसावंगी:पाऊस नसल्याने लाडसावंगीत डाळिंबाचा मृग बहर धोक्यात