Headlines

संभाजीनगरमध्ये वाहनावरील ताबा सुटून अपघात, तरुणाचा मृत्यू:हेल्मेट नव्हते, पडल्यानंतर डोक्याला लागला मार




मित्राच्या काकूंच्या अंत्यविधीवरून दुचाकीने घरी परतताना टाऊन हॉल उड्डाणपुलावर वाहनावरील ताबा सुटून झालेल्या अपघातात २१ वर्षांच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (७ सप्टेंबर) मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास घडली. अपघातात कुटुंबातील एकुलता एक मुलगा गमावल्याने खोकडपुरा परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मोहंमद झिशान मोहंमद अली (२१, रा. ग्लोबल कॉम्प्लेक्स, खोकडपुरा, पैठण गेट) असे मृत तरुणाचे नाव असल्याची माहिती सिटी चौक ठाण्याचे निरीक्षक सचिन सानप यांनी दिली.
झिशान हा बीसीएच्या तिसऱ्या वर्षात शिकत होता. त्याच्या कुटुंबात आई, वडील आणि तो असे तिघेच राहतात. झिशान हा त्याच्या दुचाकीने मित्राच्या काकूच्या अंत्यविधीसाठी हिमायतबाग येथे गेला होता. अंत्यविधी आटोपून तो मित्रांसोबत भडकल गेटच्या दिशेने परत येत होता. टाऊन हॉल उड्डाणपुलावर त्याचा वाहनावरील ताबा सुटला आणि तो जोरात रस्त्यावर फेकला गेला. अॅनालिसिस: …म्हणून हेल्मेटसक्ती पोलिस प्रशासनाकडून हेल्मेटसक्ती राबवली जात असतानाही अपघाताच्या वेळी झिशानने हेल्मेट घातले नव्हते. दुचाकीवरून खाली फेकला गेल्यानंतर त्याच्या डोक्याला थेट मार लागल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला. हेल्मेट घातले असते तर कदाचित त्याचा जीव वाचू शकला असता. यामुळे हेल्मेटसक्ती होत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *