![]()
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज 11वा दिवस आहे. सरकारचे शिष्टमंडळ भेटून गेल्यानंतर मागण्यांबाबत आश्वासन मिळाले होते. मात्र, त्यानंतर ठोस कार्यवाही होत नसल्याने जरांगे यांनी दोन दिवसांपूर्वी पाणी आणि उपचार घेण्यास नकार दिला होता. त्यामुळे आंदोलनस्थळी उपस्थित मराठा समाजबांधवांमध्ये त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता वाढली आहे. मध्यरात्री प्रकृती खालावली दरम्यान, काल रात्री मध्यरात्री मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती आणखी खालावल्याची माहिती समोर आली. त्यांचे वजन कमी झाले असून शुगर आणि रक्तदाबही कमी झाल्याचे सांगण्यात आले. रात्री अडीच वाजता त्यांच्या प्रकृतीची तपासणी करण्यात आली. यानंतर ही माहिती सरकारमधील मंत्र्यांना देण्यात आली. प्रकृती खालावल्याची माहिती मिळाल्यानंतर मंत्री उदय सामंत आणि आमदार प्रसाद लाड यांनी जरांगे पाटील यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. सकाळपासून मागण्यांबाबत कार्यवाही सुरू करण्याचे आश्वासन दिल्यानंतर जरांगे यांनी सलाईन घेण्यास मान्यता दिल्याची माहिती आहे. मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याची भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण सोडणार नसल्याची भूमिका पुन्हा स्पष्ट केली आहे. सरकारकडून आता प्रत्यक्षात कोणती पावले उचलली जातात, याकडे आंदोलनस्थळी उपस्थित मराठा समाजाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, जरांगे यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आल्यानंतर मध्यरात्री मराठा आंदोलकांनी धुळे-सोलापूर महामार्गावर आंदोलन केले. काही ठिकाणी टायर जाळून रास्ता रोको करण्यात आल्याची माहिती आहे. आजही राज्यातील विविध भागांत आंदोलनाची शक्यता असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. आंदोलकांवर हल्ल्याचा कट दरम्यान, काल मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला, ते म्हणाले की, हे आंदोलन दाबण्यासाठी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची मिलीभगत आहे. छत्रपती संभाजीनगरात सत्ताधारी मंत्र्यांची बैठक होऊन हे आंदोलन मोडीत काढण्याचा कट रचला गेला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदेंच्या मंत्र्यांची एक बैठक पार पडली, ज्यामध्ये हे आंदोलन कसे मोडीत काढता येईल यावर सविस्तर चर्चा झाली. या कटाचाच एक भाग म्हणून मराठा समाज जेव्हा मुंबईकडे कूच करेल, तेव्हा पोलिसांकडून आंदोलकांवर अचानक हल्ला करवायचा, जेणेकरून गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस थेट बदनाम होतील. या संपूर्ण कटात भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांचीही दोन माणसे सहभागी आहेत, असा आरोप जरांगे पाटील यांनी केला आहे. फडणवीसांच्या डोक्यात तोच विचार मनोज जरांगे पाटील म्हणाले की, केवळ शिंदेंचे मंत्रीच नाही, तर फडणवीस यांच्याही डोक्यात हाच विचार सुरू आहे. मराठा आंदोलनाला हिंसक वळण देऊन आंदोलन बदनाम करणे आणि मराठा समाजाचा आवाज कायमचा दाबणे हाच या सत्ताधाऱ्यांचा छुपा अजेंडा आहे. जर मुंबईला जाताना आपल्या बांधवांना आडवा-आडवी झाली किंवा त्यांचे रक्त निघाले तर 10 मिनिटात महाराष्ट्र बंद पाडा. कारण ही सर्व मुलं आपल्यासाठी मुंबईत जात आहे. पोलिसांनी कितीही त्रास दिला तर त्यांना मराठा बांधवांनी त्यांना त्रास द्यायचा नाही. बॅरिकेट लावले तर बाजूला सरकत पुढे जायचे. शांततेत मुंबईकडे जायचे, कोणालाही मोजायचे नाही. पोलिसांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केलाच तर पळू नका, त्यांना सांगा आम्ही वर्दीचा आदर करतो म्हणून शांत आहोत. परिस्थिती नुसार पळ काढा पण दबा धरा. स्वरक्षण सुद्धा तितकेच गरजेचे आहे. गेम तर बसला पाहिजे पण दिसू पण नाही. पण खरच तशी वेळ आली तर. …तर महाराष्ट्र 10 मिनिटात बंद पाडा मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मराठा समाजाच्या कोणत्याही बांधवाला जर काही त्रास दिला गेला तर संपूर्ण महाराष्ट्र बंद पाडावा. जर मुंबईला जाण्यासाठी आडवा आडवी करण्यात आली किंवा कोणाचे रक्त निघाले तर 10 मिनिटात महाराष्ट्र बंद झाला पाहिजे. फडणवीस यांनी हल्ला केला तर संपूर्ण महाराष्ट्र बंद केला पाहिजे. प्रत्येक जिल्ह्यातील बांधवांनी 12 तारखेला आंतरवाली सराटीमध्ये बैठकीला उपस्थित रहावे मनोज जरांगे पाटील म्हणाले की, 12 तारखेला सर्व मराठा बांधवांनी आंतरवाली सराटीमध्ये यायचे आहे. कोणीही घरी बसून बैठक बघायची नाही. प्रत्येक जिल्ह्यातील लोकांनी या बैठकीला उपस्थित रहावे. हेही वाचा.. ‘…ही आपली नैतिक जबाबदारी नाही का?’: रोहित पवारांचा MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार यांना सवाल; भीमनवार यांच्या प्रतिक्रियेवर पलटवार नीट परीक्षेचा पेपरफुटी प्रकरण ताजे असतानाच एमपीएससीच्या पेपरफुटीचे प्रकरण समोर आले. त्यानंतर राज्यात विद्यार्थ्यांनी निदर्शने करण्यास सुरुवात केली. आज पुण्यात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच विरोधी पक्षातील नेत्यांनी मोर्चा काढला. सरकारसह महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्यावर देखील आरोप करण्यात आले. त्यावर आता भीमनवार यांनी निवेदन देत त्यांच्यावर होत असलेले आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच माझ्यावर होणाऱ्या आरोपांमुळे व्यथित झाल्याचे भीमनवार म्हणाले. यावर आता आमदार रोहित पवार ट्विट करत टीका केली आहे. सविस्तर वाचा
Source link
मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 11वा दिवस:मध्यरात्री प्रकृती खालावली, अडीच वाजता मंत्र्यांचा फोन; मराठा आंदोलक आक्रमक