![]()
गोंदिया-बालाघाट राष्ट्रीय महामार्गावर एक भीषण अपघात घडला आहे. नागरा परिसरात एका भरधाव ट्रक आणि बोलेरो प्रवासी वाहनाची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भयानक दुर्घटनेत 3 जणांचा जागीच मृत्यू झाला असून, अन्य 7 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या जवळच्या रुग्णालयात युद्धपातळीवर उपचार सुरू आहेत. बोलेरोचा अक्षरशः चेंदामेंदा मिळालेल्या माहितीनुसार, एक ट्रक वेगात गोंदियाकडून बालाघाटच्या दिशेने जात होता. त्याचवेळी विरुद्ध दिशेने म्हणजेच बालाघाटकडून गोंदियाकडे एक बोलेरो गाडी प्रवाशांना घेऊन येत होती. नागरा परिसरात या दोन्ही वाहनांची समोरासमोर इतकी जोरदार धडक झाली की, बोलेरो गाडीचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. आतील प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी बचाव पथकाला मोठी कसरत करावी लागली. या धडकेत बोलेरोमधील 3 प्रवाशांनी जागीच प्राण सोडले. मृत प्रवासी मध्य प्रदेशातील अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि प्रशासनाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. गंभीर जखमी झालेल्या ७ प्रवाशांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. प्राथमिक माहितीनुसार, या अपघातातील सर्व मृत आणि जखमी प्रवासी हे शेजारील मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील रहिवासी आहेत. मृतांची अधिकृत ओळख पटवण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे. या भीषण अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. हेही वाचा.. मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 11वा दिवस: मध्यरात्री प्रकृती खालावली, अडीच वाजता मंत्र्यांचा फोन; मराठा आंदोलक आक्रमक मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज 11वा दिवस आहे. सरकारचे शिष्टमंडळ भेटून गेल्यानंतर मागण्यांबाबत आश्वासन मिळाले होते. मात्र, त्यानंतर ठोस कार्यवाही होत नसल्याने जरांगे यांनी दोन दिवसांपूर्वी पाणी आणि उपचार घेण्यास नकार दिला होता. त्यामुळे आंदोलनस्थळी उपस्थित मराठा समाजबांधवांमध्ये त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता वाढली आहे. दरम्यान, काल रात्री मध्यरात्री मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती आणखी खालावल्याची माहिती समोर आली. त्यांचे वजन कमी झाले असून शुगर आणि रक्तदाबही कमी झाल्याचे सांगण्यात आले. रात्री अडीच वाजता त्यांच्या प्रकृतीची तपासणी करण्यात आली. यानंतर ही माहिती सरकारमधील मंत्र्यांना देण्यात आली. सविस्तर वाचा
Source link
गोंदिया-बालाघाट महामार्गावर भीषण अपघात:ट्रक आणि बोलेरोच्या धडकेत 3 प्रवाशांचा मृत्यू, 7 जण गंभीर जखमी