Headlines

हिंगोलीत सकल मराठा समाजाचा राजकीय कार्यक्रमांवर बहिष्कार:अंतरवाली सराटीत 50 हजार नागरिक जाणार




अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात पाठिंबा म्हणून हिंगोली जिल्हयात आगामी काळात होणाऱ्या सर्वच राजकिय कार्यक्रमांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भातील भुमीका पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी ता. ८ जाहिर केली आहे. येथील शासकिय विश्रामगृहात सकल मराठा समाजाच्या वतीने पत्रकार परिषद झाली. यावेळी भुषण देशमुख, विनायक भिसे, मनिष आखरे, अमोल जाधव, माधव कोरडे, इंगोले पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरु आहे. याआंदोलनाची शासनाने दाखल घेऊन मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली. या शिवाय जो पर्यंत मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुुरु आहे तोपर्यंत हिंगोली जिल्हयात राजकिय कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय जाहिर करण्यात आला. मराठा समाजातील एकाही नागरीकांनी राजकिय कार्यक्रमात सहभागी होऊ नये असे आवाहन यावेळी करण्यात आले. या शिवाय राजकिय पक्षांनीही कोणताही राजकिय कार्यक्रम जिल्ह्यात घेऊ नये असे आवाहन यावेळी करण्यात आलेे. तर शेतकरी, विद्यार्थी, आरोग्याच्या प्रश्‍नांवर किंवा इतर सामाजिक प्रश्‍नावर सुरु असलेल्या आंदोलनात सहभाग घेतला जाणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, अंतरवाली सराटी येथे ता. १२ सप्टेंबर रोजी हिंगोली जिल्हयातील सुमारे ५० हजार पेक्षा अधिक नागरीक जाणार आहेत. त्यासाठी सकल मराठा समाजाच्या नागरीकांनी आवश्‍यक तयारी पूर्ण केली असून त्यानंतर मुंबई येथे जाण्याची वेळ आल्यानंतर अंतरवाली सराटी येथूनच पुढे मुंबईकडे रवाना होणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे. हेही वाचा.. मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 11वा दिवस:मध्यरात्री प्रकृती खालावली, अडीच वाजता मंत्र्यांचा फोन; मराठा आंदोलक आक्रमक मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज 11वा दिवस आहे. सरकारचे शिष्टमंडळ भेटून गेल्यानंतर मागण्यांबाबत आश्वासन मिळाले होते. मात्र, त्यानंतर ठोस कार्यवाही होत नसल्याने जरांगे यांनी दोन दिवसांपूर्वी पाणी आणि उपचार घेण्यास नकार दिला होता. त्यामुळे आंदोलनस्थळी उपस्थित मराठा समाजबांधवांमध्ये त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता वाढली आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *