![]()
महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक कार्यालयाच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदाची सूत्रे गजेंद्र चिंतामण बावणे यांनी मंगळवारी (8 सप्टेंबर) स्वीकारली. प्रशासकीय सेवेत विविध महत्त्वाच्या पदांवर काम केल्यानंतर आता त्यांची महावितरणच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती झाली आहे. मूळचे नागपूर येथील रहिवासी असलेले गजेंद्र बावणे यांनी अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातून एम.एस्सी. (ॲग्री) पदवी प्राप्त केली आहे. 1999 मध्ये राज्य शासनाच्या सेवेत सरळ सेवेने उपजिल्हाधिकारी म्हणून अमरावती येथे त्यांनी प्रशासकीय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी बुलढाणा जिल्हा जात पडताळणी समितीचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले. तसेच अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयात महसूल आणि पुनर्वसन विभागाचे अतिरिक्त आयुक्त म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. विविध प्रशासकीय पदांवर काम करताना त्यांनी महसूल, पुनर्वसन तसेच सामाजिक विषयांशी संबंधित कामकाजाचा अनुभव घेतला. सन 2025 मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेत (IAS) पदोन्नती झाल्यानंतर त्यांची पुणे येथील भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या आयुक्तपदी नियुक्ती झाली. या पदावर त्यांनी जवळपास वर्षभर काम केले. त्यानंतर आता त्यांच्याकडे महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक कार्यालयाच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. हेही वाचा.. पुण्यानंतर संभाजीनगरातही विद्यार्थ्यांचा विराट मोर्चा:रोहित पवारांचा पाठिंबा, म्हणाले- MPSC मध्ये भ्रष्टाचाराची भेसळ करणाऱ्यांना खड्यासारखं बाजूला काढा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) कारभाराविरोधात पुण्यानंतर आता छत्रपती संभाजीनगरमध्येही विद्यार्थ्यांचा मोठा आक्रोश पाहायला मिळत आहे. आज शहरात निघालेल्या विद्यार्थ्यांच्या या विराट मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी पूर्ण पाठिंबा दर्शवला आहे. तसेच, या मुद्द्यावरून त्यांनी राज्य सरकारला कडक इशारा देत भाजप नेत्यांवर सडकून टीका केली आहे.सविस्तर वाचा..
Source link
महावितरणच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदी गजेंद्र बावणे रुजू:IAS पदोन्नतीनंतर छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक कार्यालयाची धुरा