![]()
खुलताबाद मराठवाडा साहित्य परिषदेच्या खुलताबाद तालुका शाखेच्या कार्यकारिणीत फेरबदल करण्यात आला आहे. तालुकाध्यक्षपदी दिनेश सावजी तर सचिवपदी योगेश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ‘मसाप’चे केंद्रीय अध्यक्ष प्राचार्य कौतिक ठाले-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कार्यवाह दादा गोविंदराव गोरे यांच्या उपस्थितीत दिनेश सावजी यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. नव्या कार्यकारिणीच्या माध्यमातून खुलताबाद तालुक्यात साहित्यिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांना चालना देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. विशेषतः ग्रामीण भागातील नवोदित कवी, लेखक आणि साहित्यप्रेमींना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाईल, असे नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. नियुक्तीनंतर आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार संजय वरकड, डॉ. गणी पटेल, साईनाथ जाधव, कवी विष्णू सुरासे यांच्यासह मान्यवरांनी नवनियुक्त तालुकाध्यक्ष दिनेश सावजी यांचा सत्कार केला. तालुकाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर दिनेश सावजी यांनी गावात साहित्य चळवळ पोहोचवणे, साहित्य संमेलने, काव्यवाचन व परिसंवादांचे आयोजन करून चळवळीला नवी दिशा देण्याचा संकल्प व्यक्त केला. मराठवाडा साहित्य परिषदेच्या नूतन सदस्यांचा सत्कार करताना मान्यवर.
Source link
‘मसाप’च्या तालुकाध्यक्षपदी सावजी:सचिवपदी योगेश पाटील, खुलताबाद शाखेच्या कार्यकारिणीची केली निवड