Headlines

Vijay Wadettiwar Slams Jarange Patil Protest & Nitesh Rane


दांडियाबद्दल अमृता फडणवीस यांनी चांगला विचार मांडला आहे. त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. पण त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना सांगून विष ओकणाऱ्या नीतेश राणेंना मंत्रिमंडळातून बाहेर काढले तर त्यांच्या बोलण्यात काही तथ्य आहे, असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवा

.

विजय वडेट्टीवार म्हणाले की, भारताचे संविधान हे सर्वांत मोठा आधार आहे. कोणी संविधानाच्या पलीकडे जात काही मागणी करत असेल तर ते सरकारला द्यायचे का नाही, संविधानाची चौकट औलाडायची का नाही हा सरकारचा प्रश्न आहे. मनोज जरांगे हे उपोषण करत आहे, त्यांनी सर्वच नेत्यांसंदर्भात जी भाषा वापरली कदाचित सरकार त्यांचे म्हणणे ऐकत नाही म्हणून ते शिवीगाळ करत असतील. जरांगे पाटील हे संविधानाच्या पलीकडे जात मागणी करत आहेत आणि ती पूर्ण करणे शक्य नाही हे सरकारला समजले. सरकार म्हणून ओबीसीसाठी त्यांनी काय केले? अनेक जण ओबीसीमध्ये आले आहेत. अनेक नेत्यांनी ओबीसी प्रमाणपत्र काढले आहे.

जरांगेंचे आंदोलन सरकारच्या गळ्यात अडकलेली हड्डी

विजय वडेट्टीवार म्हणाले की, मनोज जरांगे यांचे आंदोलन सरकारसाठी गळ्यात अडकलेल्या हड्डीसारखे झाले आहे. जरांगे पाटील त्यांना वाकवत होत. त्यांच्या मंडपात सत्ताधारी अंगचोरत कसे बसत होते हे सर्वांनी पाहिले आहे. आता स्वत:ची लाज जावू नये म्हणून सरकारने त्यांच्याकडे जाण्याचे टाळत असेल.

जिथे सत्ता तिथे राष्ट्रवादी

विजय वडेट्टीवार म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा वाऱ्यावर सुटला आहे. तो कोणाच्या ताब्यात आहे, हे आता सांगता येत नाही. अजित पवार गेल्यानंतर पक्ष कोणाच्या ताब्यात आहे सांगता येत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पक्षाने कुठे विलीनीकरण करावे नाही करावे कुणाबरोबर रहावे हे आम्ही सांगू शकत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसची आतापर्यंतची भूमिका ही सत्तेच्या बाजूने राहिली आहे, जिकडे सत्ता तिकडे राष्ट्रवादी ही भूमिका आपण पाहिली आहे. शरद पवार हे बाजूला होत ठामपणे भूमिका मांडत असतात. अजित पवार हे गंमतीने म्हणायचे की विरोधात राहून लोकांची कामे आपण करू शकत नाही.रोहित पवार हे चांगले काम करत आहेत ते पुरोगामी विचारांना घेऊन लढत आहेत.

अनेक जिल्ह्यात भयंकर परिस्थिती

विजय वडेट्टीवार म्हणाले की, राज्यात भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातील 19 जिल्ह्यात प्रचंड दुष्काळ पडला आहे. तर 83 तालुके सुखा ग्रस्त आहेत. अनेक तालुक्यामध्ये पाऊस नसल्याने पीके धोक्यात आली असून अनेक धरणं पुढील काही महिन्यात कोरडी होतील अशी परिस्थिती आहे. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात हीच परिस्थिती आहे. परभणीमध्ये गेली 44 दिवस पाऊसच झाला नाही. हे ही वृत्त वाचा मनोज जरांगे पाटलांचा उपयोग संपल्याने सरकारने त्यांना वाऱ्यावर सोडले:सरकारला त्यांना मारायचंय, खासदार संजय राऊतांचे गंभीर आरोप

सरकारच्या मते मनोज जरांगे पाटील यांचा उपयोग संपला आहे. त्यांना मनोज जरांगे पाटील यांना मारायचे आहे, आता त्यांच्या उपोषणाचा सरकारने निवडणुकीत फायदा घेतला आणि आता त्यांना वाऱ्यावर सोडले आहे. जरांगे पाटलांचे उपोषण सरकारसाठी गळ्याचा फास बनला आहे, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे आणि त्यांच्याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही, हे अत्यंत अमानुष आहे. कोणीतरी त्यांच्यासोबत चर्चा केली पाहिजे त्यातून काय मार्ग निघेल हा पुढचा प्रश्न आहे. वाचा सविस्तर मुस्लिम बांधवांनी गरब्यात सहभागी होण्यात काहीही गैर नाही!:अमृता फडणवीसांची परखड भूमिका; शांततेने उत्सवाचा आनंद घ्यायला हरकत नाही!

गणेशोत्सवानंतर आता नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गरब्यात मुस्लिमांना प्रवेश द्यायचा की नाही, यावरून महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक वातावरण तापू लागले आहे. हिंदुत्ववादी संघटनांकडून गरबा आणि दांडिया कार्यक्रमांमध्ये मुस्लिमांच्या प्रवेशावर निर्बंध घालण्याची मागणी होत असतानाच मंत्री नितेश राणे यांनीही ‘लव्ह जिहाद’चा मुद्दा उपस्थित करत मुस्लिम तरुणांना गरब्यात प्रवेश देऊ नये, अशी भूमिका मांडली होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.