Headlines

Maharashtra Aggregator Policy Update; Pratap Sarnaik Mandates Marathi Language


राज्यात ओला, उबेर आणि रॅपिडोसारख्या ॲग्रिगेटर कंपन्यांच्या माध्यमातून चालणाऱ्या प्रवासी वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी राज्य सरकारने अत्यंत कठोर पावले उचलली आहेत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषद घेत नवीन ॲग्रिगेटर धोरणाची घोषणा केली. यास

.

ओला-उबेर चालकांसाठी नवी आणि कडक नियमावली

सहकार टॅक्सी, देवदत्त टॅक्सी, सिटी फ्लो, रॅपिडो, ओला, उबेर आणि शालिनी कॅब्स यांसारख्या कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीनंतर शासनाने नवीन नियम लागू केले आहेत. 1989च्या परिवहन नियमात 12 ऑगस्ट 2026 रोजी केलेल्या बदलानुसार, आता ओला-उबेर आणि रॅपिडोच्या सर्व ड्रायव्हर्सना ‘मराठी’ येणे सक्तीचे करण्यात आले आहे.

15 वर्षांचे डोमिसाईल आणि चारित्र्य प्रमाणपत्र

चालकाकडे राज्याचे 15 वर्षांचे रहिवासी प्रमाणपत्र आणि चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र असणे अनिवार्य करण्यात आले आहे. अनेक बांगलादेशी घुसखोर महिना-पंधरा दिवसांसाठी मुंबईत येतात. धारावीसारख्या झोपडपट्ट्यांमध्ये एका खोलीत २०-२५ जण राहून दोन-दोन शिफ्टमध्ये ओला-उबेर चालवतात. यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेला मोठा धोका निर्माण झाला आहे. या घुसखोरीला आळा घालण्यासाठीच सरकारने हे कडक नियम लागू केले आहेत. यापुढे सर्व ॲग्रिगेटर चालकांना आरटीओकडून (RTO) अधिकृत बॅज दिला जाईल. या सर्व अटींची पूर्तता करण्यासाठी कंपन्यांना तीन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.

धर्मवीर आनंद दिघे महामंडळातून चालकांना संरक्षण

ज्या चालकांना आरटीओचा बॅज मिळेल, त्यांना ‘धर्मवीर आनंद दिघे रिक्षा-टॅक्सी व प्रवासी वाहतूक महामंडळा’चे थेट सदस्यत्व दिले जाईल. या महामंडळासाठी शासनाने ५० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. ॲग्रिगेटर कंपन्यांकडून प्रवाशांकडून आकारण्यात येणाऱ्या एकूण भाड्यातून (Fare) २ टक्के रक्कम या महामंडळात जमा केली जाईल. या निधीतून चालकांच्या कुटुंबीयांना आणि त्यांच्या पाल्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत पुरवली जाईल. सुरक्षेच्या कारणास्तव कंपन्यांना दुचाकी, तीन चाकी, चार चाकी आणि बसेससाठी स्वतंत्र ॲप (App) तयार करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

धाराशिवमध्ये भीषण दुष्काळ; चारा छावण्यांचे आदेश

धाराशिवचे पालकमंत्री म्हणून प्रताप सरनाईक यांनी जिल्ह्यातील पाणीबाणीवर गंभीर चिंता व्यक्त केली. जिल्ह्यात सध्या फक्त 8 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. परतीचा पाऊस जरी चांगला झाला, तरी हा साठा 22 टक्क्यांच्या पुढे जाण्याची शक्यता नाही. पावसाअभावी आणि ‘यलो फिव्हर’ नावाच्या रोगामुळे जिल्ह्यातील सोयाबीन पिकाचे फार मोठे नुकसान झाले आहे. जिल्हा आता दुष्काळाच्या ‘ट्रिगर 2’ कडे वाटचाल करत आहे. सरनाईक यांनी जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन जिल्ह्यात तातडीने चारा छावण्या सुरू करण्याचे आणि पिण्याच्या पाण्यासाठी टँकर्स तसेच पाण्याच्या टाक्या उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत.

संजय राऊतांना टोला आणि एसटीच्या विशेष गाड्या

खासदार संजय राऊत हे परिवहन मंत्र्यांना भेटायला येणार होते, मात्र ते आले नाहीत. यावर सरनाईक यांनी मिश्किल टोला लगावत म्हटले की, “मी त्यांच्यासाठी शाल आणि पुष्पगुच्छ आणून ठेवला होता. त्यांनी मला ‘सामना’ कार्यालयात प्रवेश दिला नाही, पण मी त्यांना मंत्रालयात आमंत्रित केले होते. ते आले नाहीत, पण राहुल नार्वेकरांच्या माध्यमातून मी तो पुष्पगुच्छ त्यांच्या घरी नक्की पाठवेन.” तसेच, आगामी गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळाने कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी 5900 विशेष गाड्या सोडल्या आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार या गाड्यांची 30 टक्के दरवाढ रद्द करण्यात आली असून, तोटा सहन करूनही नागरिकांना उत्तम सेवा दिली जाईल, असे सरनाईक यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू असताना राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. सरकार आणि जरांगे यांच्यात चर्चेचे दरवाजे अद्याप खुले असल्याचे सांगतानाच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जरांगे यांच्या सरकारमधील नेत्यांवरील टीकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत एकेरी भाषेचा वापर योग्य नसल्याचे त्यांनी सुनावले. मात्र, सरकारने जरांगे यांच्या 15 पैकी 12 मागण्या मान्य केल्या असून उर्वरित 3 मागण्यांवर कायदेशीर चाचपणी सुरू असल्याचा दावा सरनाईक यांनी केला.

‘चर्चेची तयारी आजही आहे, पण भाषेची मर्यादा पाळा’

प्रताप सरनाईक म्हणाले की, सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलेले नाही. त्यांच्या 15 मागण्यांपैकी 12 मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. उर्वरित 3 मागण्यांबाबत कायदेशीर प्रक्रिया आणि चाचपणी सुरू आहे. सरकारच्या वतीने उदय सामंत, प्रसाद लाड आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी जरांगे यांना काही काळ देण्याची विनंती केली आहे. मात्र, सरकार चर्चेसाठी तयार असताना मुख्यमंत्री किंवा सरकारमधील नेत्यांबाबत एकेरी भाषेत बोलणे योग्य नसल्याचे सरनाईक यांनी स्पष्ट केले. मराठा समाजाच्या संस्कृतीला आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीला अशा प्रकारची भाषा शोभत नाही, असेही ते म्हणाले. जरांगे यांच्याकडून अशीच भाषा सुरू राहिली तर सरकारमधील लोकही रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवतात, असा इशाराही त्यांनी दिला.

काल कौतुक, आज टीका; जरांगेंच्या भूमिकेवर सरनाईकांचा टोला

मनोज जरांगे पाटील यांच्याकडून काही दिवसांपूर्वी आपले कौतुक झाले होते, असे सांगत सरनाईक यांनी त्यांच्या बदलत्या भूमिकेवर टोला लगावला. काल जरांगे काय म्हणतात आणि आज काय म्हणतात, याचा अंदाज बांधता येत नाही. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक वक्तव्यावर प्रतिक्रिया देणे योग्य नाही, असे ते म्हणाले. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारने दिलेली आश्वासने आणि त्यावर झालेली कार्यवाही जनतेसमोर मांडण्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे. या पार्श्वभूमीवर सरकार आणि जरांगे यांच्यातील संघर्ष पुढे कोणत्या दिशेने जातो, याकडे लक्ष लागले आहे.

हेही वाचा…

आता कोंडी जरांगे पाटलांनीच फोडावी!:मंत्री उदय सामंत म्हणाले- मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आम्ही एक नाही, शंभर पावले पुढे आलोय

मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकार मराठा समाजाला न्याय हक्क मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असून, मराठवाडा विभागात कुणबी प्रमाणपत्र आणि जात पडताळणी दाखले देण्याची प्रक्रिया अत्यंत जलदगतीने सुरू असल्याचे प्रतिपादन राज्याचे मंत्री उदय सामंत आणि आमदार प्रसाद लाड यांनी केले आहे. आजच्या पत्रकार परिषदेत त्यांनी मराठवाड्यातील जात प्रमाणपत्रांच्या अद्ययावत आकडेवारीची माहिती दिली. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.