Headlines

मराठवाड्यात कुणबी प्रमाणपत्रासाठी 10 सप्टेंबरपासून विशेष शिबिरे:आठही जिल्ह्यांतील प्रलंबित अर्ज तातडीने निकाली काढण्याचे आदेश




मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा जात प्रमाणपत्रांच्या वाटपात ‘शून्य प्रलंबित्व’ आणण्यासाठी राज्य सरकारने प्रशासनाला कडक निर्देश दिले आहेत. या प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणि गती आणण्यासाठी १० ते १७ सप्टेंबर या कालावधीत मराठवाड्यात विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून, ‘एकही प्राप्त अर्ज निर्णयाविना शिल्लक राहणार नाही’ असे उद्दिष्ट प्रशासनाला देण्यात आले आहे. अधिकाऱ्यांसोबत मॅरेथॉन बैठक जात प्रमाणपत्र वाटपाच्या प्रक्रियेतील अडचणी दूर करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरच्या स्मार्ट सिटी कार्यालयात आज प्रांताधिकारी आणि जात पडताळणी अधिकाऱ्यांसोबत तब्बल अडीच तास सविस्तर बैठक पार पडली. या बैठकीला मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील हे मुंबईतून दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. तर, उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार प्रसाद लाड, विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांच्यासह आठही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते. नोंदींचे भाषांतर आणि पारदर्शकता कुणबी नोंदींचे संगणकीकरण करून त्या नागरिकांना सहज पाहता याव्यात, यासाठी गावनिहाय आणि मंडळनिहाय याद्या प्रसिद्ध करण्याचे निर्देश डॉ. विखे पाटील यांनी दिले. तसेच, मोडी, उर्दू आणि इतर भाषांमधील जुन्या अभिलेखांचे तातडीने मराठी भाषांतर करून त्या नोंदी जिल्ह्यांच्या अधिकृत संकेतस्थळांवर आणि ग्रामपंचायतींमध्ये उपलब्ध करून द्याव्यात, अशी महत्त्वपूर्ण सूचना मंत्री उदय सामंत यांनी केली. नामंजूर अर्जांची कारणे स्पष्ट करा हैदराबाद गॅझेटच्या आधारे तयार करण्यात आलेल्या प्रमाणित कार्यपद्धतीबाबत (SOP) अधिकाऱ्यांमध्ये कोणताही संभ्रम राहू नये, याची दक्षता घेण्याचे आदेश बैठकीत देण्यात आले. तसेच, ज्यांचे अर्ज नामंजूर झाले आहेत, त्यांना कागदपत्रांची अपूर्णता किंवा वंशावळीचे पुरावे नसणे यांसारखी कारणे प्रशासनाने स्पष्टपणे सांगावीत. प्रांताधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदा घेऊन प्रशासनाच्या कामाची अद्ययावत माहिती नियमितपणे जनतेपर्यंत पोहोचवावी, असेही या बैठकीत स्पष्ट करण्यात आले आहे. प्रशासनाच्या कामाची माहिती जनतेपर्यंत पोहोचवा एसओपीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आयुक्त, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि जात पडताळणी समितीच्या प्रमुखांमध्ये प्रभावी समन्वय असणे आवश्यक आहे. सर्व जिल्ह्यांतील संबंधित अधिकाऱ्यांनी कुणबी नोंदी, प्राप्त अर्ज, वितरित प्रमाणपत्रे तसेच प्रलंबित प्रकरणांची अद्ययावत माहिती नियमितपणे प्रसारमाध्यमांना द्यावी. यासाठी प्रांताधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदा घेऊन प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या कामाची माहिती जनतेपर्यंत पोहोचवावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. या बैठकीला विभागातील आठही जिल्ह्यांतील जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांचे अध्यक्ष, सदस्य, सदस्य सचिव तसेच उपविभागीय अधिकारीही बैठकीस उपस्थित होते. हेही वाचा.. जरांगेंच्या उपोषणाचा 12 वा दिवस: मराठ्यांचे वाटोळे करणारे तुम्हाला चालणार का? मराठ्यांच्या अंगावर मराठे सोडले तर शिंदे संपून जातील- जरांगे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आज 12 वा दिवस आहे. आंतरवाली सराटीमध्ये 12 तारखेला राज्यव्यापी बैठक होणार आहे. या बैठकीत मुंबईला जाण्याची तारीख स्पष्ट केली जाणार आहे. काल मराठा आंदोलकांनी आक्रमक होत आंदोलन केले आहेत. मनोज जरांगे पाटील मुंबईत जाण्यापूर्वी सरकार काही तोडगा काढणार का? हे पाहणं महत्त्वाचे आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *