Headlines

कर्ज फेडण्यासाठी आईचे धक्कादायक कृत्य:मुलीचे अश्लील फोटो-व्हिडीओ सावकाराला पाठवल्याचा आरोप




कर्जाची परतफेड करता येत नसल्याने एका महिलेने आपल्या 18 वर्षीय मुलीवर सावकाराकडे जाण्यासाठी दबाव टाकल्याचा धक्कादायक प्रकार नागपुरात समोर आला आहे. मुलीने नकार दिल्यानंतर तिचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ काढून सावकाराला पाठवल्याचा आरोप आहे. तसेच हा प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही मुलीने पोलिसांना सांगितले. या प्रकरणी इमामवाडा पोलिसांनी पीडितेच्या आईविरुद्ध गुन्हा दाखल केला असून संबंधित सावकाराचा शोध सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित 18 वर्षीय तरुणी ही इमामवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत वडील आणि बहिणीसोबत राहते. तिची आई सामाजिक कार्य करते. जानेवारी महिन्यात आईने एका व्यक्तीकडून कर्ज घेतले होते. मात्र, आर्थिक परिस्थितीमुळे तिला हे कर्ज वेळेत फेडता आले नाही. त्यामुळे संबंधित सावकार वारंवार कर्जाच्या पैशांसाठी तिच्यावर दबाव टाकत होता. मुलीला सावकाराकडे पाठवण्याचा दबाव कर्जाची रक्कम परत मिळवण्यासाठी सावकार महिलेच्या घरीही येत होता. याचदरम्यान त्याची नजर महिलेच्या मुलीवर पडली. त्याने मुलीला आपल्याकडे पाठवण्याची मागणी केल्याचे तक्रारीत नमूद आहे. आईनेही मुलीला कर्जाची परिस्थिती सांगून त्या व्यक्तीकडे जाण्यासाठी दबाव टाकला. मात्र, मुलीने त्याला स्पष्ट नकार दिला. यानंतर सावकाराने मुलीचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ पाठवण्याची मागणी केली. मुलीच्या आरोपानुसार, आईने तिच्यावर दबाव टाकून तिचे अश्लील फोटो काढले आणि व्हिडीओ तयार केला. त्यानंतर हे फोटो आणि व्हिडीओ संबंधित सावकाराला पाठवण्यात आले. कोणाला सांगितल्यास धमकी घडलेला प्रकार कोणालाही सांगू नये, यासाठी आईने मुलीला धमकावल्याचाही आरोप आहे. हा प्रकार बाहेर सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. तसेच स्वतः काहीतरी करून घेण्याची धमकीही आईने दिल्याचे मुलीने पोलिसांना सांगितले. वडिलांना सांगितल्यानंतर प्रकरण उघडकीस दरम्यान, पीडितेच्या आईचे तिच्या पतीसोबत भांडण झाले होते. त्यानंतर ती १ एप्रिल रोजी एका मित्रासोबत मुंबईला गेली आणि तेव्हापासून घरी परतली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. आई घराबाहेर गेल्यानंतर मुलीने वडिलांना संपूर्ण प्रकार सांगितला. मुलीचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची भीती असल्याने वडिलांसोबत तिने इमामवाडा पोलिस ठाण्यात धाव घेतली. मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी तिच्या आईविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच मुलीवर दबाव आणणारा सावकार कोण आहे, त्याने नेमकी काय मागणी केली आणि या प्रकरणात त्याची भूमिका काय आहे, याचा पोलिस तपास करत आहेत. संबंधित व्यक्तीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. हेही वाचा.. राज्यात 15 ऑक्टोबरपासून गाळप हंगामाचा श्रीगणेशा:साखरेचे दर वाढवण्यासाठी राज्य सरकार केंद्राकडे करणार शिफारस
राज्यातील सन २०२६-२७ च्या आगामी ऊस गाळप हंगामाचे धोरण निश्चित करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे मंत्री समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत यंदाचा गाळप हंगाम १५ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू करण्यास अधिकृत मान्यता देण्यात आली. तसेच, शेतकरी आणि साखर उद्योगाच्या हिताचा समतोल साधत साखर कारखान्यांना दिलासा देणारे अनेक मोठे निर्णय या बैठकीत घेण्यात आले. सविस्तर वाचा..



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *