Headlines

लामकाना परिसरात 12 वर्षीय मुलाचा शेततळ्यात बुडून मृत्यू:आईसोबत नातेवाइकांकडे आलेला असतानाच घडली घटना‎




आईसोबत मामाच्या गावाला आलेल्या १२ वर्षीय एकुलत्या एक बालकाचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी १० वाजता लामकाना (ता. छत्रपती संभाजीनगर) येथे घडली. स्वप्नील प्रमोद वाहूळे (१२, रा. बाजार गेवराई, ता. बदनापूर, जि. जालना) असे मृत बालकाचे नाव असून या घटनेने लामकाना परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. स्वप्नील लामकाना येथे आईच्या मामाच्या गावी आला होता. बुधवारी सकाळी तो मामाच्या शेतात गेला असताना शेतालगतच्या गणेश धोंडीराम बारबैले यांच्या शेततळ्यात तो अचानक बुडाला. ग्रामस्थांनी तातडीने त्याला पाण्यातून बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. एकुलत्या एक मुलाचा असा अचानक डोळ्यांदेखत अंत झाल्याने आईने केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. या घटनेमुळे वाहूळे व बारबैले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची माहिती मिळताच करमाड पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार सोपान डकले व शिवाजी मदेवाड या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *