Headlines

औट्रम घाटात कार दरीत जाण्यापासून वाचली:कार रस्त्याच्या कडेला असताना अज्ञात वाहनाने दिली धडक, कारमधील दोघेही सुखरूप‎




सोलापूर-धुळे महामार्गावरील धोकादायक बनलेल्या कन्नड औट्रम घाटात पुन्हा एकदा मोठा अपघात टळला. बुधवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास महादेव मंदिरालगत एक कार (एमएच ०५ एएक्स ९६३५) खोल दरीत जाता जाता वाचली असून, कारमधील दोघेही सुखरूप आहेत. जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथील मनोज पाटील आणि डॉ. दीपक वामन पाटील हे दोघे पुणे येथून आपल्या गावी जात होते. पहाटे घाटात लघुशंकेसाठी त्यांनी गाडी थांबवली असता, एका अज्ञात वाहनाने कारला पाठीमागून धडक दिली. या धडकेने कार थेट दरीच्या दिशेने फेकली गेली. मात्र सुदैवाने काठावरील एका झाडाला अडकल्याने अनर्थ टळला. कारमधील प्रवाशांच्या आरडाओरड्यानंतर स्थानिक चांगदेव राठोड व घाटमार्ग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. हवालदार सचिन आडावतकर, शांताराम थोरात, बापू पाटील, दीपक जगताप, ललित महाजन व विजय महाजन यांच्या पथकाने क्रेनच्या साहाय्याने कार आणि दोन्ही प्रवाशांना बाहेर काढले. याच मार्गावर २३ ऑगस्टला एसटी बसचा अपघात छत्रपती संभाजीनगर ते सुरत जाणाऱ्या एसटी बसचा २३ ऑगस्ट रोजी कन्नड घाटातील जय मल्हार वळणावर अचानक स्टिअरिंग रॉड तुटला. भीषण उतारावर नियंत्रण सुटल्याने डोळ्यांसमोर खोल दरी दिसताच चालक सुभाष पल्हाळ यांनी प्रसंगावधान राखत तातडीने गिअर कमी करून ब्रेक दाबला. बस रस्त्याच्या कडेला असलेल्या कठड्यात अडकून तरंगल्याने ५ हजार फूट खोल दरीत कोसळता कोसळता वाचली होती.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *