![]()
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करण्यासोबतच विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून महानगरपालिका शिक्षण विभागाचा लौकिक वाढवणाऱ्या शिक्षक शैक्षणिक गुणवत्तेसह नावीन्यपूर्ण उपक्रमांना सलाम देण्यासाठी शिक्षक दिनानिमित्त गौरव करण्यात आला आहे. महानगरपालि
.
यावेळी अध्यक्षस्थानी उपमहापौर सचिन भेंडे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून महानगरपालिका आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले, स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, विरोधी पक्षनेते विलास इंगोले, गटनेते शेख हमीद शेख वाहेद, शिक्षण समिती सभापती ॲड. प्रीती रेवणे, महिला व बालविकास सभापती ममता आवारे, शिक्षण समिती सदस्य सुनीता भेले, नगरसेवक नजीब खान करीम खान, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त भाग्यश्री बोरेकर, सहाय्यक आयुक्त भूषण पुसतकर यांच्यासह महानगरपालिका शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षणाधिकारी डॉ. प्रकाश मेश्राम यांनी केले.सूत्रसंचालन चंचल दातीर व प्रणाली ठाकरे यांनी केले. सहाय्यक कार्यक्रम अधिकारी पंकजकुमार सपकाळ यांनी आभार मानले.
९ शाळांचा सत्कार महानगरपालिका शाळांमधील गुणवत्ता वाढत असल्याचे दहावी व बारावीच्या निकालातून अधोरेखित झाले. दहावी-बारावीच्या परीक्षेत ८० टक्क्यांपेक्षा अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झालेल्या महानगरपालिकेच्या नऊ शाळांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांचा उत्कृष्ट निकाल हा शिक्षकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन, विद्यार्थ्यांची मेहनत आणि पालकांच्या सहकार्याचे फलित असल्याचे नमूद करण्यात आले.
उर्दू शाळेतील उपक्रम कौतूकास्पद; गुणवत्तेला चालना अमरावती महानगरपालिकेच्या आदर्श शाळा पुरस्कारासाठी मनपा उर्दू शाळा क्र. १२, लालखडीची निवड करण्यात आली. शैक्षणिक गुणवत्तेसोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची दखल घेत शाळेला हा पुरस्कार देण्यात आला. विद्यार्थ्यांना विविध उपक्रमांच्या माध्यमातून शिक्षणाच्या प्रवाहात सक्रिय सहभागी करून घेणाऱ्या मनपा उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळा, जेवड या शाळेला उपक्रमशील शाळा पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.