![]()
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी शुक्रवारी आमठाणा चौफुली येथे सकल मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सकाळी साडेनऊच्या सुमारास झालेल्या या आंदोलनात परिसरातील मराठा समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अर्धा तास चाललेल्या या आंदोलनामुळे सिल्लोड-धुळे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत शासनाने मराठा मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, या मागणीसाठी आंदोलकांनी रस्त्यावर ठिय्या देत घोषणाबाजी केली. आंदोलनस्थळी नायब तहसीलदार तुकाराम बनकर, सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र ठाकरे, मंडळ अधिकारी विष्णू सोनवणे आणि तलाठी विशाल पाटील उपस्थित होते. या वेळी जिल्हा परिषद सदस्य दिलीप दाणेकर, रघुनाथ कदम, सचिन चौधरी, जिल्हा परिषद सदस्य राधाभाऊ काकडे, रघुनाथ मोरे, अशोक मोरे, अरुण मोरे, राहुल सपकाळ, रंगनाथ कदम, लक्ष्मण डफळ, सागर गवते व डॉ. संजय जामकर आदींनी आंदोलनाला संबोधित करत एकजुटीने लढा देण्याचे आवाहन केले.
Source link
आमठाणा चौफुली येथे 30 मिनिटे रास्ता रोको:सिल्लोड-धुळे मार्गावरील वाहतूक पडली ठप्प