![]()
तालुक्यातील गोदेंगाव येथे १९ वर्षीय तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. मंजू गोकुळ खैरनार (१९, रा. गोदेंगाव) असे मृत तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून करण अनिल वाघ (रा. निंभोरा, ता. सोयगाव) याच्याविरुद्ध सोयगाव ठाण्यात गुन्हा दाखल आहे. मंजू ही आई व आजोबांसोबत राहत होती. पोलिसांनी करण वाघ याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
Source link
सोयगाव:गोदेंगावात 19 वर्षीय तरुणीची आत्महत्या