Headlines

निवेदन:जामनेर तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा




जामनेर तालुक्यात गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून पावसाने पूर्णपणे दडी मारल्याने उभ्या पिकांची अतोनात हानी झाली आहे. तोंडाशी आलेला घास हिरावल्याने तालुक्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून शासनाने तत्काळ तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला. तहसीलदार नानासाहेब आगळे यांना हे निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे स्थानिक नेते दिलीप खोडपे, तालुका अध्यक्ष किशोर पाटील, प्रल्हाद बोरसे यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *