![]()
लोकमान्य टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ पुण्यात रोवली. मात्र, गाव पातळीवर व खेड्यात हा सार्वजनिक गणेशोत्सव सुरू होण्यासाठी बराच काळ लागला. पुण्यात गणेशोत्सवाला मोठी ऐतिहासिक परंपरा व समृद्ध वारसा लाभला आहे. पुण्याच्या धर्तीवर बार्शीतही सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात झाली. बार्शीचे स्वातंत्र्य सैनिक (स्व.) बलभीम बरीदे, वसंत खुडे, कोंडिबा होनमाने, नाना सुरवसे यांच्या पुढाकारातून १९४२ मध्ये म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात बार्शीतील पहिला सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाला. आझाद गणेश मंडळ आणि बुरुड गल्लीच्या माध्यमातून सुरू झालेला हा गणेशोत्सव आजोबा गणपती या नावाने यंदा ८६ वे वर्ष साजरे करत आहे. त्याकाळी विद्युत पुरवठ्याची सोय नसल्याने विद्युत रोषणाई नसल्याने गणपती मंडळ कंदील, दिवे आणि वातीच्या मशाली पेटवून प्रकाशाची सोय करत असत. वर्गणीदेखील रोख रक्कम स्वरूपात नव्हती. ती बारा बलुतेदार यांच्याकडून साहित्य घेऊन जमा केले जात. स्वस्त धान्य दुकानातून आलेले कापड देऊन बदल्यात हवी ती वस्तू घेत अशी माहिती आझाद मंडळाचे सदस्य सुनील खुडे यांनी दिली. यावर्षी पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराची प्रतिकृती हा देखावा सादर केला आहे. बजरंग बरीदे (अध्यक्ष), राज सदावर्ते, अक्षय चंदिले, ऋषिकेश सावंत, अभिषेक गायकवाड, महेश गायकवाड, रणवीर ठाकूर , महेश खंबाळे, नीलेश खुडे, समर्थ गायकवाड, अक्षय कवडे,अनिकेत गायकवाड. मार्गदर्शक : कुणाल नरके, लखन राजपूत, राज ढोले, सागर शिराळ, महेश देसाई. मंडळाच्या अध्यक्षपदी बजरंग बरीदे मागील १५ वर्षांपासून मंडळ रक्तदान शिबिर घेत आहे मंडळाच्या वतीने मागील सुमारे १५ वर्षापासून रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येत असून गरजूंना रक्तपुरवठा करण्यात मंडळाने मोलाचा वाटा उचलला आहे. सुमारे २५ वर्षांपासून शेगावीचा राणा संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज पालखीचे शहरात आगमन होताच मंडळाच्या वतीने स्वागत केले जाते. पालखी सोबत पायी आलेल्या वारकऱ्यां ची सेवा केली जाते.
Source link
आजोबा मंडळाकडून रक्तदान अन् देखावे:बार्शीतील आजोबा गणेशोत्सव मंडळाचे यंदा 86 वे वर्ष