![]()
निवडणुकीत मतांसाठी दारात येणाऱ्या लोकप्रतिनिधींना आता गावातच प्रवेश नाकारण्याची वेळ आली आहे! बेलपिंपळगाव (ता. नेवासे) येथील ग्रामस्थांनी विकासकामे, शेतीचे पाटपाणी आणि वीजपुरवठ्याच्या प्रश्नावर संताप व्यक्त करत गावाच्या मुख्य प्रवेशद्वारावर ‘आजी-माजी
.
निवडणुकीच्या काळात आश्वासनांची खैरात; मात्र निवडून आल्यानंतर गावच्या समस्या जैसे थे, असा ग्रामस्थांचा आरोप आहे. वर्षानुवर्षे मुख्य रस्ते आणि अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था कायम आहे.
मंजूर कामे रखडलेली असून झालेली कामेही निकृष्ट दर्जाची होत असल्याचा संताप नागरिकांनी व्यक्त केला.
सध्या खरिपाचा हंगाम सुरू असताना शेतीला हक्काचे पाणी मिळत नसल्याने पिके करपण्याच्या मार्गावर आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा आणि पाटपाण्याचा प्रश्न यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये नाराजी वाढली आहे.
पाणीप्रश्नासाठी रस्ता रोको करूनही तोडगा निघाला नसल्याने अखेर गावकऱ्यांनी फलकाच्या माध्यमातून लोकप्रतिनिधींना इशारा दिला.
दरम्यान, ग्रामदैवत श्री रोकडोबा हनुमान यात्रा उत्सवानिमित्त माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी गावात येऊन दर्शन घेतले. त्यावेळी कोणताही विरोध झाला नाही. आमदार विठ्ठलराव लंघे-पाटील आल्यानंतर ग्रामस्थांशी चर्चा झाली आणि त्यानंतर प्रवेशद्वारावरील फलक हटवण्यात आला. फलक हटला असला तरी ग्रामस्थांच्या मनातील प्रश्न कायम आहेत. त्यामुळे ‘फलक गेला; पण गावबंदीमागचा संताप कुठे गेला?’ हा प्रश्न आता लोकप्रतिनिधींसमोर उभा राहिला आहे. बेलपिंपळगाव ग्रामस्थांनी गावच्या प्रवेशद्वारावर लावलेला गावबंदीचा फलक.
हक्काचे पाणी मिळाले पाहिजे शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आजी-माजी आमदार-खासदारांना गावात प्रवेशबंदी. हक्काचे पाटपाणी मिळालेच पाहिजे, असा पवित्रा बेलपिंपळगाव येथील ग्रामस्थांनी घेतला आहे.