Headlines

409 दिवसांच्या विरहानंतर माधुरी नांदणीत परतली..!:काेल्हापुरात हत्तिणीचे फुलांची उधळण करत स्वागत




तब्बल ४०९ दिवसांच्या विरहानंतर आणि ३२ तासांचा प्रवास करून शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील स्वस्तिश्री जिनसेन मठाची लाडकी हत्तीण ‘महादेवी’ ऊर्फ ‘माधुरी’ शुक्रवारी मध्यरात्री परतली. तिच्या आगमनाने भाविकांनी फटाक्यांची आतषबाजी आणि फुलांची उधळण करत जल्लोष केला. गुरुवारी सायंकाळी जामनगरच्या वनतारा केंद्रातून विशेष ॲनिमल ॲम्ब्युलन्सने तिला आणले. शुक्रवारी रात्री साडेबाराच्या सुमारास ती नांदणीत पोहोचली. गांधी चौकात आगमन होताच जेसीबीने फुलांची उधळण करण्यात आली. वनतारामध्ये सव्वा वर्ष काळजी घेण्यात आली गुजरातेत अनंत अंबानी यांच्या वनतारामध्ये सव्वा वर्ष माधुरीची काळजी घेतली गेली. आवश्यक वैद्यकीय उपचारांनंतर ती आता ठणठणीत आहे. नांदणी मठातही माधुरीसाठी वैद्यकीय पथकासह आवश्यक त्या सर्व सुविधा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *