![]()
वांबोरी ते शेंडी फाटा या प्रमुख जिल्हा मार्गावर प्रशासकीय अनास्थेचा आणि मनमानी कारभाराचा नमुना समोर आला आहे. पिंपळगाव माळवी फाटा परिसराजवळ अवघ्या ५० मीटर अंतराच्या आत तब्बल १४ गतिरोधक टाकले आहेत. निकष डावलून हे गतिरोधक केल्यामुळे दुचाकी पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. पांढरे पट्टे मारले नसल्याने वाहनचालक गोंधळून अपघाताची शक्यता आहे. वांबोरी, डोंगरगण, पिंपळगाव माळवी, आढाववाडी यासह पंचक्रोशीतील गावांना जिल्ह्याच्या ठिकाणी जोडणारा हा मार्ग आहे. पिंपळगाव माळवी फाट्याजवळ वेगाने वाहन आल्यास, अपघात होण्याचा धोका आहे. यापार्श्वभूमीवर तेथे गतिरोधक टाकण्याची जुनीच मागणी होती. बांधकाम विभागाने निकष डावलून हे गतिरोधक उभारले आहेत. दरम्यान,सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासकीय यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही तेथे रम्बलर स्ट्रिप्स बसवण्याबाबत सांगितले होते, परंतू तेथे डांबरी गतिरोधक टाकले. जेसीबीने ते काढून दोन्ही बाजुला काढून रम्बलर स्ट्रिप्स टाकू. ^ पिवळ्या रंबलर स्ट्रिप्स पुरेशा होत्या, पण बाकीचे ब्रेकर कोणत्याही स्टँडर्डचे नाहीत. रम्बलर स्ट्रिप्स लांबून दिसतात व सावकाश जावे असा त्याचा अर्थ आहे. स्पीड ब्रेकरसाठी एक कमिटी असते, त्या कमिटीची मंजुरी घ्यावी लागते. त्यावर पट्टे मारायला हवे होते. १४ गतिरोधकांची गरज वाटत नाही. एन.डी. कुलकर्णी, सेवानिवृत्त शहर अभियंता.
Source link
जिल्हा मार्गावर 50 मीटरमध्ये तब्बल 14 गतिरोधक:पिंपळगाव माळवी फाटा येथील प्रकार