Headlines

गणरायाचं आगमन, महाराष्ट्रात जल्लोष:लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी अलोट गर्दी; अमित शहा-उद्धव ठाकरेंपासून सेलिब्रिटी लावणार हजेरी




देशभरासह राज्यभरात आजपासून लाडक्या गणरायाचे मोठ्या उत्साहात आगमन झाले असून, मुंबईत गणेशोत्सवाचा अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळत आहे. लालबागच्या राजापासून ते गणेश गल्लीपर्यंत बाप्पाच्या दर्शनासाठी सकाळपासूनच भाविक आणि राजकीय दिग्गजांची गर्दी उसळली आहे. लालबागचा राजा (93 वे वर्ष) यंदा लालबागच्या राजाचा मंडप आणि बाप्पाचे स्वरूप ‘महादेव (शिव)’ थीमवर आधारित आहे. या देखाव्याच्या केंद्रस्थानी एक विशाल त्रिशूळ उभारण्यात आला असून बाप्पाचे रूप अत्यंत मनमोहक दिसत आहे. मुंबईचा राजा, गणेश गल्ली (99 वे वर्ष) मंडळाचे हे 99 वे वर्ष असून यंदा 22 फुटांची बाप्पाची ‘बॅलन्सिंग’ बालमूर्ती साकारण्यात आली आहे. येथे महाराष्ट्राची ‘संत परंपरा’ आणि तिचे महत्त्व दर्शवणारा अप्रतिम देखावा उभारण्यात आला आहे. सुरळीत दर्शनासाठी मंडळाचे स्वयंसेवक 8 तासांच्या शिफ्टमध्ये काम करत आहेत. उद्धव ठाकरे घेणार दर्शन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज सहकुटुंब बाप्पाच्या दर्शनाला येणार आहेत. दुपारी 1 वाजेदरम्यान ते ‘मुंबईच्या राजा’चे (गणेश गल्ली) दर्शन घेतील आणि त्यानंतर दुपारी दीड वाजता ‘लालबागच्या राजा’च्या चरणी लीन होतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा आजचा मुंबई दौरा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज नवी मुंबई आणि मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. राजभाषा संमेलनाच्या उद्घाटनासोबतच ते विविध ठिकाणी गणेश दर्शन घेणार असून, त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहतील. ————————- हेही वाचा.. गणेश चतुर्थी आज, स्थापनेसाठी दिवसभरात 5 मुहूर्त:घरात बसलेले गणेश आणि ऑफिस, दुकान, कारखान्यांसाठी उभे गणपती शुभ आज म्हणजे 14 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीपासून गणेशोत्सव सुरू होईल. या दिवशी गणपती स्थापनेसाठी दिवसभरात 5 शुभ मुहूर्त आहेत. ग्रंथांमध्ये घरगुती पूजेसाठी मातीच्या लहान गणेश मूर्तीचे विधान मिळते. मूर्ती स्थापित केल्यानंतर दररोज सकाळी-संध्याकाळी दिवा, दुर्वा, फुले आणि नैवेद्य अर्पण करून पूजा करण्याची परंपरा आहे. गणेश चतुर्थीला चंद्र पाहणे टाळण्याचे विधानही आहे. गणेशोत्सवाचे मुख्य विसर्जन अनंत चतुर्दशी, 25 सप्टेंबर रोजी होईल. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *