Headlines

मुले, मुलींच्या गटात छत्रपती संभाजी नगरने मिळवले यश:34 व्या राज्यस्तरीय ज्युनिअर तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धा‎




अमरावती जिल्हा तलवारबाजी संघटना व डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ३४ व्या राज्यस्तरीय ज्युनिअर तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धेचा (मुले व मुली) समारोप मोठ्या उत्साहात झाला. दि. ११ ते १३ सप्टेंबर २०२६ दरम्यान ही स्पर्धा झाली. राज्यभरातील संघांनी सहभाग घेतला. मुले व मुलींच्या गटात छत्रपती संभाजीनगरने जेतेपद पटकावले. बक्षीस वितरण समारंभ रविवार, १३ रोजी दुपारी ३ वाजता झाला. या समारंभासाठी प्रमुख अतिथी राज्यसभा खा. डॉ. अनिल बोंडे यांच्या हस्ते खेळाडूंना पुरस्कार प्रदान करण्यात आले. खासदारांनी आपल्या भाषणात अमरावती जिल्हा तलवारबाजी संघटनेला अद्ययावत क्रीडा साहित्य देण्याचे मान्य केले. याप्रसंगी उदय डोंगरे, सचिव, महाराष्ट्र तलवारबाजी संघटना व सहसचिव, ऑलिम्पिक संघटना, श्री शिवाजी बीपीएड कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुभाष गावंडे, डॉ. संगिता बोंडे (शिंदे), डॉ. स्मिता देशमुख (प्राचार्य, विमलाबाई देशमुख महा.), विलास ठाकरे, डॉ. सुरज येवतीकर (मिनिगोल्फ संघटना पदाधिकारी), अनिल इंगळे (क्रीडा अधिकारी, अमरावती), नरेंद्र देशमुख, विजय मेटकर, अनिल पंड्या, स्पर्धेच्या मुख्य आयोजक संगिता येवतीकर (कार्याध्यक्ष), डॉ. विकास येवतीकर (सचिव, अम. जिल्हा फेन्सिंग असो.) उपस्थित होते. त्यांनी मान्यवरांचे स्वागत केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विशाल भेलांडे, राज कांबळे, दिपांशू पेंढरकर, अमन कुरवाह, अरबाज मोनावाले, अमोल ठाकरे, आदेश डोंगरे, अजिंक्य वानखडे, सुमेध सिरसाट, सागर सहारे, सिद्धेश वैष्णव, अनिकेत मानकर, श्रेयश गवळी, मैरा बल्सीए, विवेक गुप्ता, पियुष देशमुख, लोकेश भुतकुले, रोहन कुरे, विरजीत रोजी, प्रेम सुनो, सई राजपूत आदींनी परिश्रम घेतले. स्पर्धेचा अंतिम निकाल (सांघिक विजेतेपद): मुले: प्रथम क्रमांक – छत्रपती संभाजीनगर, द्वितीय क्रमांक – लातूर, तृतीय क्रमांक – नाशिक. मुली: प्रथम क्रमांक – छत्रपती संभाजीनगर, द्वितीय क्रमांक – पुणे, तृतीय क्रमांक – लातूर. विजेत्या संघांना मान्यवरांच्या हस्ते चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *