![]()
अंजनगाव बारी सर्कलमधील पार्डी (देवी) येथे सुरू असलेले अवैध व अनधिकृत दारूविक्रीचे सर्व धंदे तात्काळ बंद करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. या मागणीसाठी ग्रामस्थांनी बडनेरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे १२ सप्टेंबर रोजी सामूहिक
.
गावातील विविध ठिकाणी दारूविक्री सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी निवेदनातून केला आहे. दारू सहज उपलब्ध होत असल्याने तरुण पिढीवर विपरीत परिणाम होत आहे. कौटुंबिक वाद, भांडणे, शिवीगाळ, मारामारी, महिलांना त्रास, सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन अशा घटना वाढण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
केवळ एखाद्या एका ठिकाणी कारवाई न करता गावातील दारूविक्रीची सर्व संभाव्य ठिकाणे तपासावीत. परवाना नसलेल्या किंवा नियमबाह्य पद्धतीने सुरू असलेल्या विक्रीवर कायदेशीर कारवाई करावी. अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच दारूची अवैध विक्री, साठवणूक, वाहतूक करणाऱ्यांवर नियमानुसार गुन्हे दाखल करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
शाळा, मंदिर, सार्वजनिक ठिकाणे, वस्ती, नागरिकांची ये-जा असलेल्या परिसरात दारूविक्री होत असल्यास विशेष दखल घ्यावी. भविष्यात असे प्रकार पुन्हा होऊ नयेत. यासाठी नियमित पोलीस गस्त व तपासणी वाढवावी. अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी सरपंच अक्षय मेश्राम यांच्या नेतृत्वात पोलीस पाटील नितीन बेंडे, नितीन ढेंबरे, नीलेश महल्ले, जितेंद्र ढेंबरे, गणेश मेश्राम, आकाश मेश्राम, रणजित मेश्राम, अभय नेवारे, प्रांजल गडलींग, प्रशांत मानकर, अर्पित ढेंबरे, सुशील सुवागपुरे, अशोक नगरगडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
महिलांच्या सुरक्षेची चिंता गावातील महिला व नागरिकांच्या तक्रारींची गांभीर्याने दखल घ्यावी. तातडीने कार्यवाही करावी. अवैध दारूविक्रीची माहिती देणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी. आवश्यक प्रतिबंधात्मक कारवाई करावी. अशी मागणीही ग्रामस्थांनी केली आहे.